ब्राह्मणेतर समाजाकडे श्रध्दास्थळांचा ताबा द्या!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ब्राह्मणेतर समाजाकडे श्रध्दास्थळांचा ताबा द्या!

वैष्णव देवी मंदिरात प्रवेशिकेत झालेल्या चेंगराचेंगरीत बारा भाविकांचा मृत्यू होणे ही बाब धक्कादायक आहे. पहाड, दऱ्या अशा नैसर्गिक स्थळांवर उभारलेली श्र

’जेलर’ बघण्यासाठी चेन्नई-बंगलोरमध्ये कंपन्यांना सुटी
भारतात कोरोना लसीकरण मोहिमेने ओलांडला 63 कोटींचा टप्पा
वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

वैष्णव देवी मंदिरात प्रवेशिकेत झालेल्या चेंगराचेंगरीत बारा भाविकांचा मृत्यू होणे ही बाब धक्कादायक आहे. पहाड, दऱ्या अशा नैसर्गिक स्थळांवर उभारलेली श्रध्दास्थाने ऐतिहासिक असतात. परंतु, तो इतिहास केवळ मौखिक किंवा दंतकथांच्या रूपाने असतो. भारतातील बहुजन समाजाला त्याचा इतिहास माहीत नसला तरी संस्कृती म्हणून त्यांनी जतन करून ठेवलाय, असे आपणांस हमखास म्हणता येईल. यापूर्वी महाराष्ट्रात मांढर देवी येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले होते. भाविकांची सर्वाधिक गर्दी ही देवींच्या दर्शनासाठी येत असते. याचाच दुसरा अर्थ असा की, देवी या स्त्रीचे रूप आहेत. स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक व्यवस्थेच्या प्रतिक आहेत. भारतातील मुळनिवासी असणारा समाज हा मातृसत्ताक-स्त्रीसत्ताक आहे. त्यामुळे, देवींच्या मंदिरात भाविकांचे येण्याचे प्रमाण अधिक असते. तितकाच या देवींच्या विषयक दंतकथा जर आपणांस जाणून घ्यायच्या असतील तर त्या-त्या देवींवर रचलेल्या लोकगीतांतून आपणांस तत्कालीन समाजाचा सांस्कृतिक इतिहास देखील ज्ञात होतो. नाशिक जिल्ह्यातील वणी गडावर असणाऱ्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देखील अशाच पध्दतीने भाविकांची गर्दी  येते. परंतु, ही गर्दी बहुजनांची असते. वणी गडावरील त्या मंदिराच्या बाहेर परशुराम जो ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रतिक आहे, त्याच्यावर सप्तश्रृंगी देवीने हल्ला केल्याचा उल्लेख त्या भागातील अनेक ओव्या किंवा लोकगीतांतून सापडतो. सप्तश्रृंगी देवी या सांस्कृतिक दृष्ट्या ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात असणारा हा उल्लेख ब्राह्मणी शक्तींना खटकणारा आहे. वैष्णवी देवीच्या संदर्भात देखील यापेक्षा वेगळा सांस्कृतिक भाग असण्याचे कारण नाही. भारतात जे-जे लोकप्रिय आहे, ते-ते बहुजनांचे आहे, एवढी साधी स्पष्टता याबाबत सांगता येईल. आज वैष्णवी देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीचे सांगत असताना इतर देवींचा संदर्भ हा पूरक म्हणून दिला आहे, ज्यातून आम्हाला जे म्हणायचे आहे, ते सिध्द होईल. देवींचा बहुमान असणारी संस्कृती ही बहुजनांची आहे. त्यामुळे याठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात येतात हे देखील सत्य आहे. भाविकांची एवढी प्रचंड गर्दी होणाऱ्या ठिकाणी कुंभमेळ्यात घेतली जाते तशी आणि तितकी काळजी का घेतली जात नाही? किंवा तितक्याच तोलामोलाचे नियोजन का केले जात नाही? हा आमच्या मनात उभा राहणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचे आमच्या परिने उत्तर देण्याचाही आम्ही याच लेखात प्रयत्न करित आहोत. देवींची देवस्थाने ही बहुजनांची श्रध्दास्थाने आहेत. त्यामुळे याठिकाणी बहुजन भाविक मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे साहजिकच त्याठिकाणी श्रध्दास्थान म्हणून मोठ्या प्रमाणात या भाविकांकडून खर्च केला जातो. मां वैष्णोदेवी, शेरावली, अंबे अशा विविध नावांनी संबोधित केल्या जाणाऱ्या वैष्णोदेवी च्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची मात्र कोणतीही काळजी घेतली जात नाही, ही सर्वात भीषण बाब आहे; आणि याला जबाबदार ब्राह्मणी व्यवस्था आणि विचार आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण देशातील कोणत्याही मंदिरांचा ताबा आणि तेथील बाजारपेठेचा कब्जा हा ब्राह्मण किंवा पुरोहितांकडेच असतो. याचाच थेट अर्थ बहुजन भाविकांचा पैसा ओरबाडताना त्यांच्या सुरक्षेचे कोणतेही नियोजन केले जात नाही! म्हणूनच या बहुजनांची श्रध्दास्थाने असलेल्या मंदिर प्रशासनाचा पूर्णपणे ताबा ब्राह्मणेतर समाजाकडे सोपवण्यात यावा. त्याशिवाय, अशा चेंगराचेंगरी किंवा त्यासदृश अनेक दुर्घटना कायमच्या थांबणार नाहीत, अशी आमची थेट मागणी आहे! आजपर्यंत, भारतातील ज्या श्रध्दास्थळांवर दुर्घटना झाल्या त्या बहुतांशी श्रध्दास्थळांचे वास्तव हेच आहे की, बहुजन किंवा ब्राह्मणेतर समाजाची श्रध्दास्थाने आहेत.

COMMENTS