भारतात कोरोना लसीकरण मोहिमेने ओलांडला 63 कोटींचा टप्पा

Homeताज्या बातम्यादेश

भारतात कोरोना लसीकरण मोहिमेने ओलांडला 63 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : भारतातील समग्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 63 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात 73,85,866 लसीकरणाच्या मात्रा देण्या

भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावर दबाव ः केजरीवाल
श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त बहिरवाडीत पारायण सोहळा
Jalna : पिंजारी समाज बांधवांची संघटन बैठक (Video)

नवी दिल्ली : भारतातील समग्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 63 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात 73,85,866 लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या. रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने 63 कोटी 09 लाखाचा (63,09,17,927) टप्पा पार केला. हे लसीकरणाच्या 67,80,301 सत्रांच्या आयोजनातून साध्य करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 35,840 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे (महामारीच्या प्रारंभीच्या काळापासून) आतापर्यंत कोविड मधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,18,88,642 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर सध्या 97.53 % वर आला आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्ममक प्रयत्नांमुळे गेले सलग 63 दिवस रोज नोंदविल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. भारतात गेल्या 24 तासात 45,083 नव्या कोविडबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या 3,68,558 आहे. ही संख्या देशातील एकूण कोविड बाधित संख्येच्या 1.13 % आहे. देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार सुरू असून गेल्या 24 तासांत एकूण 17,55,327 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 51 कोटी 86 लाख (51,86,42,929) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार होत असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.28 % इतका आहे. हा दर गेले 65 दिवस 3 % पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 2.57 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आता गेले 34 दिवस 3 % पेक्षा कमी आणि सलग 83 दिवस 5 % पेक्षा कमी राहिला आहे.

COMMENTS