Homeताज्या बातम्यादेश

शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

नवी दिल्ली ः राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी शरद पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्याय

विजयसिंह मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश ठरला
शरद पवार गटाकडून पर्यायी पक्षाचे नाव सादर
शरद पवार गटाच्या 10आमदारांना नोटीस

नवी दिल्ली ः राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी शरद पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तसेच शरद पवार गटाला एक आठवड्याच्या आत निवडणूक चिन्ह द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.
निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेऊन एका आठवड्यात नवे चिन्ह देण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवण्याची विनंती केली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करण्याची असल्याने हेच नाव द्यावे, असे मनु सिंघवी म्हणाले. या मागणीनुसार शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यावर एका आठवड्याच्या आत चिन्ह द्यावे असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर निवडणुक आयोगाने ्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यांनी होणार आहे.

COMMENTS