Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

पुणे: मॉडेलिंगची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर प

मढीत मानाची होळी पेटवत कानिफनाथ यात्रेला सुरूवात
दुभंगलेली मने जुळवण्याचे काम न्या. नेत्रा कंक यांनी केले
दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील ग्रामस्थांचे हक्क अबाधित राहतील : दत्तात्रय भरणे

पुणे: मॉडेलिंगची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली आहे. करण अण्णा पगारे (वय 25, मूळ रा. सामनगाव, नाशिक, सध्या रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी करण ओळखीचे आहेत. नाशिक येथे एका मॉडेलिंगसाठी तरुणीसाठी छायाचित्रे काढण्यात आली होती. करण सध्या पुण्यात राहायला आहे. नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी काढलेले छायाचित्रे नातेवाईक, आई-वडील, तसेच समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन करण याने तरुणीवर वडगाव शेरी भागातील एका हॉटेलमध्ये बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला करणने धमकावले. माझ्याशी संबंध न ठेवल्यास जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार करण्याची धमकी दिली. समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. तरुणीने त्याला नकार दिला. तेव्हा करणने छायाचित्रे तिच्या वडिलांना पाठविली. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

COMMENTS