Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘गजनी’ फेम अभिनेत्री असिन होतेय नवऱ्यापासून विभक्त ?

आमिर खानच्या 'गजनी' चित्रपटातील 'कल्पना' प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. कल्पनाची व्यक्तिरेखा असिनने साकारली होती. असिनचा हिंदीच नाही तर साऊथ चित

विमानामध्ये एअर होस्टेसचा विनयभंग
हिजाब बंदीच्या निमित्ताने..
श्रावण मासाचे औचित्य साधून धोंडे जेवण, गोसेवा व गोपूजन सोहळा

आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटातील ‘कल्पना’ प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. कल्पनाची व्यक्तिरेखा असिनने साकारली होती. असिनचा हिंदीच नाही तर साऊथ चित्रपटांतही बोलबाला आहे. मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मासोबत लग्न केल्यानंतर तिने सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला होता. आता तिने पतीसोबतचे सर्व फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले आहेत. तिने त्‍यांच्‍या लग्‍नाचे फोटोही काढले आहेत, त्‍यानंतर चाहत्‍यांना धक्का बसला आहे. असिन पती राहुलपासून घटस्फोट घेत आहे की काय, अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे. असिन आणि राहुल शर्मा यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर १९ जानेवारी २०१६ रोजी लग्न केले. दिल्लीत हा विवाह सोहळा ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार पार पडला. २०१७ मध्ये असिनने मुलगी अरिनला जन्म दिला. असिनच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिची ५ वर्षांची मुलगी अरिनच्या वाढदिवसाचे फोटो आहेत. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर तिने तिच्या भावनिक पोस्टमध्ये राहुलसोबतचा एक फोटो ठेवला होता. तोदेखील तिने हटवलेला नाही. हा मोनोक्रोम फोटो असीन आणि राहुलच्या लग्नाच्या रिसेप्शनचा आहे, ज्यात ऋषी कपूर देखील उपस्थित होते. २०१२ मध्ये ‘हाऊसफुल २’ या सिनेमाच्या निमित्ताने असिन प्रायव्हेट जेटने ढाकाला जात होती, असे सांगितले जाते. अक्षय कुमारही तिच्यासोबत होता. अक्षय आणि राहुल शर्मा जवळचे मित्र होते. अक्षयनेच असिनची राहुलशी ओळख करून दिली होती आणि दोघांनाही डेट करण्याचा सल्ला दिला होता, तर असिनने त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यावेळी असिनला माहित नव्हते की ती ज्या जेटमधून आली होती त्याचा मालक राहुल आहे. तिला त्याच्या साधेपणाची खात्री पटली आणि नंबर्सची देवाणघेवाण केल्यावर दोघांमधील संवाद वाढत गेले आणि मग प्रेम लग्नाच्या मुक्कामापर्यंत पोहोचले. असिन आणि राहुलच्या एका फॅन पेजने दोघांच्या विभक्त होण्याच्या अफवांवर दावा केला आहे. असिनने फेब्रुवारीमध्येच राहुलसोबतचे तिचे फोटो डिलीट केल्याचे सांगण्यात येत आहे. पेजच्या अॅडमिनने या जोडप्याचे काही फोटो शेअर केले आणि काही काळापासून असिन तिच्या पोस्ट कशा अपलोड आणि डिलीट करत आहे, हे सांगितले. तथापि, असिन आणि राहुल वेगळे होणार आहेत का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असिनने राहुलसोबतचे तिचे सर्व फोटो का डिलीट केले यामागचे कारण काय आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही

COMMENTS