अहमदनगर/प्रतिनिधी : विवाहितेला तिचा पती व नणंदेने गळा आवळून व तोंडात बळजबरीने औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिसात गुन्ह
अहमदनगर/प्रतिनिधी : विवाहितेला तिचा पती व नणंदेने गळा आवळून व तोंडात बळजबरीने औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता कोमल राहुल घोडके (रा.घोडकेवाडी, घोसपुरी, ता.नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 7 डिसेंबर रोजी ही घटना घडली. पती राहुल बबन घोडके व नणंद मीना संजय झरेकर (दोघे रा.घोसपुरी, घोडके वाडी, ता.नगर) अशी आरोपींची नावे आहेत. पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित विवाहिता ही पती व मुलांसह सासरी नांदत होती. तिची नणंद मीना हिचे त्यांच्याकडे कायम येणे-जाणे होते. कौटुंबिक वादातून पीडितेने 2020 साली महिला दिलासा केंद्रात पती राहुल व नणंद सविता आणि मीना या मानसिक व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार दिली होती. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेच्या वडीलांची समजूत काढून तिला पुन्हा नांदविण्यास नेले होते. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास पीडिता ही गायींना खुराक चारत असताना तिची नणंद मीना हिने, माझ्या गायांना खुराक चारु नको, मी माझी चारीन, असे सांगितले. यावेळी तिच्या पतीने पीडितेच्या अंगावर धावून जात तिचा गळा दाबला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पीडितेच्या तोंडात जबरदस्तीने औषध ओतले. यावेळी नणंद मीना हिने ‘हिला आज खपवून टाक, हिचं खूप झालं आहे’, असे म्हणत नवर्याला प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक यु. ए. चव्हाण करात आहेत. या घटनेमुळे घोडकेवारी-घोसपुरी परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS