Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराला 14 सुवर्ण

गुरुग्राममध्ये पार पडली स्पर्धा; एकूण अठ्याहत्तर पदकांची लयलूट

संगमनेर/प्रतिनिधी ः हरयाणातील गुरुग्राममध्ये पार पडलेल्या 26 व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवाराच्या दैनंदिन कराटे वर्गातील मु

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तातडीने शिक्षा देण्याचा स्वतंत्र कायदा करावा – बाळासाहेब सानप
राहुरी तालुक्यातील वळणला गावठी कट्टा तर गंगापुरला तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक  
आपत्तीत मदत करणारे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ः प्रा. बारहाते

संगमनेर/प्रतिनिधी ः हरयाणातील गुरुग्राममध्ये पार पडलेल्या 26 व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवाराच्या दैनंदिन कराटे वर्गातील मुलांचाच बोलबाला बघायला मिळाला. कराटेच्या विविध चार प्रकारात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत संगमनेरातील 49 स्पर्धकांनी सहभाग नोंदवतांना 14 सुवर्णपदकांसह एकूण 78 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील स्पर्धकांचा मोठा सहभाग होता.


ओकिनावा मार्शल आर्टच्यावतीने गुरुग्राम येथील इन्फीनिटी बॅडमिंटन अकादमीत झालेल्या चार दिवशीय स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगाणा, हरयाणा, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक या राज्यांमधून सातशेहून अधिक कराटे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. काता आणि कुमिती या मार्शल आर्टमधील सांघीक आणि वैयक्तिक प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात गीता परिवाराच्या दैनंदिन कराटे वर्गातील 19 मुलींनी सहभागी होतांना या दोन्ही प्रकारात तीन सुवर्ण, सात रौप्य व 22 कांस्य पदकांची कमाई केली. तर मुलांच्या गटात सहभागी झालेल्या संगमनेरच्या तीस स्पर्धकांनी या संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवतांना 11 सुवर्ण पदकांसह 16 रौप्य व 23 कांस्य पदके मिळवली. या एकूण स्पर्धेत गीता परिवाराच्या कराटेपटूंनी एकूण 14 सुवर्ण, 23 रौप्य व 41 कांस्य पदकांसह 78 पदके मिळवतांना नवा विक्रमही केला. दत्ता भांदुर्गे, प्रमोद मेहेत्रे, विकास गुंजाळ, आशुतोष गायकवाड, ऋषीकेश कडूस्कर, अश्‍वीनी कोळी, सचिन राजपूत, ओम जोर्वेकर व शुभम गायकवाड यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS