Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित साहित्यशोध ग्रंथ वाचकांची नैतिकता वाढवितो – डॉ. वाघमारे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः महानुभाव, वारकरी पंथ यामधील महंत आणि संत तुकाराम, संत नामदेव, सानेगुरुजी, बहिणाबाई, यशवंतराव चव्हाण, नामदेव ढसाळ इत्या

दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान
टक्केवारी घेतल्याचे सिद्ध करा, नाहीतर तुम्ही राजीनामे द्या
जनावरांसाठी चारा छावणी चालू करा

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः महानुभाव, वारकरी पंथ यामधील महंत आणि संत तुकाराम, संत नामदेव, सानेगुरुजी, बहिणाबाई, यशवंतराव चव्हाण, नामदेव ढसाळ इत्यादींच्या स्थळ, काळ, साहित्यप्रेरणा, आविष्कार यावर शोध घेऊन त्याचे मर्म शोधून काढणारा प्रा. डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा  साहित्यशोध हा शोधग्रंथ वाचकांची नैतिकता घडवणारा आहे, असे मत सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.      

 
वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे श्रीरामपूर मार्केट यार्ड शिवाजीनगर परिसरातील शेळके हॉलमध्ये डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ’साहित्यशोध’पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष वाघमारे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजी काळे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी प्राचार्य टी. ई. शेळके, महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीरामपूर शाखा कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, वडूज येथील मोरे, विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, शब्दगन्ध साहित्यिक परिषदेचे तालुका अध्यक्ष लेविन भोसले आदी उपस्थित होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा कवयित्री संगीता फासाटे, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, खजिनदार मंदाकिनी उपाध्ये आदिंनी नियोजन केले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून ’साहित्यशोध ’पुस्तकाचा परिचय करून दिला, मान्यवरांचे सत्कार केले.


    डॉ. सुभाष वाघमारे यांनी पुस्तक प्रकाशन केल्यानंतर आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, ’साहित्यशोध’ हे पुस्तक माणूस समजून घेण्याचा प्रवास आहे. वर्तमान काळात मानवी भावनांचा चिखल होत असताना मनाला सदाचरणी करणार्‍या मूल्यांची जोड दिली पाहिजे असे सांगणार्‍या माणसांची निवड डॉ. उपाध्येसरांनी केलेली आहे. तत्वचिंतन करून सारग्रहण करणारे निर्मळ मन म्हणजे हा ग्रंथ आहे. प्रसार माध्यमातून व समाज माध्यमातून येणार्‍या राजकीय व धार्मिक विकृतीनी तरुणांची मने भटकली आहेत त्यांना चांगला जीवन उद्देश देणारे हे पुस्तक आहे.बदलत्या काळात अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणात येत आहे.त्यासाठी अनुवाद करण्याचे कौशल्य घ्यावे लागेल तसेच प्रसार माध्यमांनी मूल्यभान ठेवावे लागेल हे आग्रही प्रतिपादन या ग्रंथात आहे. यावेळी बोलतांना डॉ. वाघमारे म्हणाले की, 1990 नंतरच्या ग्रामीण कवितेच्या स्थित्यंतराचा शोध या ग्रंथात आहे. प्राचीन मराठी साहित्यापासून ते आधुनिक साहित्य प्रवाहापर्यंत भावलेल्या निवडक  सात्विक साहित्यातील मूल्यगर्भ आशय संक्षेपाने मांडून विधायक मूल्यविचार वाचकांना देत, त्यांची जाणीव घडवणारा हा ग्रंथ मराठी साहित्य विश्‍वाला संयम आणि सदाचार याची शिकवण देत राहील, असा तयार झाला आहे. मराठीच्या सांस्कृतिक व साहित्य विश्‍वात हे माणुसकीचे लेणे सर्वांनी पाहिले, वाचले व आचरणात आणले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन डॉ. वाघमारे यांनी केले. डॉ. शिवाजी काळे, प्राचार्य शेळके, सुखदेव सुकळे, लेविन भोसले यांनी ’साहित्यशोध’घेण्यातच जीवनाची मती, नीती, गती आणि वृत्ती यांचे भरणपोषण होणार असल्याचे सांगितले. डॉ.उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


माणूस समजून घेण्याचा प्रवास प्रेरणादायी –
पुस्तक प्रकशानानंतर डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले की, ’साहित्यशोध’ हे पुस्तक माणूस समजून घेण्याचा प्रवास आहे. वर्तमान काळात मानवी भावनांचा चिखल होत असताना मनाला सदाचरणी करणार्‍या मूल्यांची जोड दिली पाहिजे असे सांगणार्‍या माणसांची निवड डॉ. उपाध्ये सरांनी केलेली आहे. तत्वचिंतन करून सारग्रहण करणारे निर्मळ मन म्हणजे हा ग्रंथ आहे. प्रसार माध्यमातून व समाज माध्यमातून येणार्‍या राजकीय व धार्मिक विकृतीनी तरुणांची मने भटकली आहेत त्यांना चांगला जीवन उद्देश देणारे हे पुस्तक आहे.बदलत्या काळात अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणात येत आहे.त्यासाठी अनुवाद करण्याचे कौशल्य घ्यावे लागेल तसेच प्रसार माध्यमांनी मूल्यभान ठेवावे लागेल हे आग्रही प्रतिपादन या ग्रंथात असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

COMMENTS