Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गावठी कट्ट्यासह पकडली

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी  गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूसासह दरोड्यासाठी लागणाऱ्या घातक शस्त्रासह नगरकडे येणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गु

गुणरत्न सदावर्तेंचं भाजपशी कनेक्शन आहे काय? l Lok News24
संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्साहात
राष्ट्रीय स्पर्धेत संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे यश

अहमदनगर/प्रतिनिधी  गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूसासह दरोड्यासाठी लागणाऱ्या घातक शस्त्रासह नगरकडे येणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले.त्यांच्या कडून 4 लाख 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सावेडी परिसरातील पाईप लाईन रोड जवळील भिस्तबाग महाला जवळ केली.

या बाबतची माहिती अशी की हकिगत अशी की, राखाडी रंगाचे इरटीगा कारमधील काही इसम नगर शहर परिसरात कोठेतरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने घातक हत्यारे घेवुन कॉटेज कॉर्नर ते भिस्तबाग महाल रोडने येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथक तपोवन रोड, भिस्तबाग महाला जवळ सापळा लावुन थांबले. थोड्याच वेळात एक राखाडी रंगाची कार कॉटेज कॉर्नर रोडने महालाकडे येताना दिसली. पथकाची खात्री होताच चालकास गाडी थांबवण्याचा इशारा करताच त्याने गाडी थांबविली. वाहनातील संशयीतांना पोलिसांनी  त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे नयन राजेंद्र तांदळे ( वय 29, रा.पवननगर, पाईपलाईन रोड, अ.नगर,) लियाकत जाफर शेख ( वय 36, रा.जेऊर बायजाबाई, ता. नगर,) अमोल लक्ष्मण रणसिंग ( वय 35, रा. केडगांव, ता.नगर ) धुराजी नामदेव महानुर ( वय 25, रा. आष्टी, जिल्हा बीड ) बजरंग नारायण मिश्रा ( वय 35, रा.भिस्तबाग चौक, सावेडी, अ.नगर ) असे असल्याचे सांगितले. संशयीतांची अंगझडती घेतली असता अंगझडती मध्ये 36 हजार 500 रुपये किंमतीचा गावठीकट्टा व तीन जिवंत काडतुस, 1 हजार रुपये किंमतीचा एक कोयता, 500 रुपये किंमतीचे बटनाचे दोन चाकु, 56 हजार रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सात मोबाईल फोन, लाकडी दांडके व 4 लाख रुपये किंमतीची एक इरटीगा कार असा एकुण 4 लाख 94 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोठेतरी दरोड्यासारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने आणल्याची कबुली दिल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. यातील

नयन राजेंद्र तांदळे, अमोल रणसिंग, बजरंग मिश्रा हे सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द दरोडा तयारीचा, व भारतीय हत्यार कायदा कलमान्वये.गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस स्टेशन करीत आहे. 

COMMENTS