Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरून गडकरींना धमकी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात अतिशय मोठी बातमी पुढे आली आहे.  बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा य

मणिपुर प्रकरणात भाजपाचा खरा चेहरा जगासमोर आला-राजेसाहेब देशमुख
निवडणूक आयोग नरमला !
शेतकरी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शोधतात नवनवीन मार्ग……. 

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात अतिशय मोठी बातमी पुढे आली आहे.  बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
बेळगावच्या तुरुंगात कैद असताना जयेश पुजारीने  14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसर्‍यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने  दिली होती. गडकरींना आलेल्या धमकीच्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. अकबर पाशा हा प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडियाचा (पीएफआय) सदस्य आहे. त्यामुळे नागपूर पोलीस बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अखबर पाशासह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार आहे. त्यासाठी नागपूर पोलीस परत एकदा बेळगावला जाणार आहे. बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोन वेळा जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्‍या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणार्‍या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. जयेश उर्फ शाकीर सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह लश्कर-ए- तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागे दोरे देशाच्या सीमेपलीकडे ही जात आहे आणि त्यानुषंगाने नागपूर पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS