Homeताज्या बातम्यादेश

शांततेच्या संदेशासह जी-20 परिषदेची सांगता

जागतिक नेत्याचे राजघाटवर महात्मा गांधींना नमन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राजघाटावर जी-20 कुटुंबाने शांतता, सेवा, करूणा आणि अहिंसेचे प्रतीक असलेल्या महात्मा गांधींना श्रद्धाजंली वाहत, जगाला पुन्हा

राम चरणच्या बहिणीने 29 व्या वर्षी घेतला घटस्फोट
शिवनाथ चावरे यांचे भाजपचे जिल्हाध्यक्षांकडून सांत्वन
फडणवीसांच्या कारवर चप्पल फेक करणाऱ्यांवर कुठला गुन्हा दाखल होणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राजघाटावर जी-20 कुटुंबाने शांतता, सेवा, करूणा आणि अहिंसेचे प्रतीक असलेल्या महात्मा गांधींना श्रद्धाजंली वाहत, जगाला पुन्हा एकदा शांततेचा संदेश देज जी-20 परिषदेची सांगता करण्यात आली. महात्मा गांधीजींचे सामंजस्यपूर्ण शाश्‍वत आदर्श, सर्वसमावेशक विचार समृद्ध जागतिक भविष्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतात, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
राजधानी दिल्लीत आयोजित ऐतिहासिक जी-20 शिखर परिषदेची रविवारी सांगता करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी ’एक भविष्य’ या विषयावर चर्चा केल्यानंतर जी-20 शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा केली. यावेळी पंतप्रधानांनी नोव्हेंबरच्या शेवटी सर्व नेत्यांना पुन्हा एकदा व्हर्च्युअल माध्यमातून भेटण्याचे आणि या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे आवाहन केले. समारोपाची घोषणा करताना पंतप्रधानांनी जागतिक शांततेचा संदेश दिला आणि 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह सर्वांचे आभार मानले. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले, ’तुम्हा सर्वांना माहिती आहे की, नोव्हेंबरपर्यंत जी-20 च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे आहे. अजून अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसात तुम्ही सर्वांनी अनेक गोष्टी इथे मांडल्या, सूचना दिल्या, अनेक प्रस्ताव आले. त्या प्रस्तावांना गती कशी मिळेल, हे पाहणे आपली जबाबदारी आहे. आपण नोव्हेंबरच्या शेवटी जी-20 चे आणखी एक व्हर्च्युअल सत्र आयोजित करू आणि त्या सत्रात या शिखर परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना पुढील जी-20 अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द केली.  ‘योअर हायनेस, एक्सीलेंस यासोबतच मी जी-20 शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा करतो.  एक पृथ्वी, एक कुटुंब, वन भविष्याचा  आनंददायी असावा. स्वस्ति अस्तु विश्‍वस्य म्हणजे संपूर्ण जगात आशा आणि शांती असावी. 140 कोटी भारतीयांसाठी या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार,’ असा संदेश मोदींनी यावेळी दिला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केले भारताचे कौतुक- जी-20 शिखर परिषदेत भारताचे महत्व आणि शक्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जगातील प्रमुख देशांना एकाच मंचावर आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जगभरात भेडसावत असलेल्या महागाई, बेरोजगारीच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच जगाला भेडसावत असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भारताकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. जर आम्ही विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली तर सर्वांनाच फायदा मिळेल, असे बायडन यांनी म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्था वातावरणातील बदलांचे संकट, नाजुकता आणि संघर्षाच्या धक्क्यांनी त्रस्त आहे. अशा परिस्थितीत यावर्षीच्या शिखर संमेलनाने जी-20 आजही आमच्यासमोरील सर्वात गंभीर मुद्द्यावर तोडगा काढू शकते, हे सिद्ध झाले असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.

COMMENTS