संगमनेर ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या जन सुविधा योजनेअंतर्गत ताल
संगमनेर ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या जन सुविधा योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध रस्त्यांकरता 2 कोटी 73 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.
या रस्ते कामांच्या निधीबाबत माहिती देताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर काम करताना संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवला आहे याचबरोबर संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असतानाही प्रत्येक गावच्या वाडी वस्तीवर विविध विकास कामांसाठी निधी दिला आहे. नुकताच 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत साठीच्या जन सुविधा योजनेअंतर्गत विविध रस्त्यांकरता दोन कोटी 73 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. या निधीमधून गुंजाळवाडी ते ढवळे वस्ती रस्त्यासाठी 15 लाख रुपये, घुलेवाडी गावांतर्गत नरोडे वस्ती ते निळवंडे डावा कालवा रस्त्या करता 5 लाख रुपये, घुलेवाडीतील इग्नाती चौक व शिवशाही कॉलनी सुशोभीकरणासाठी 15 लाख रुपये ,गुंजाळवाडी ते गोल्डन सिटी रस्त्यासाठी 10 लाख रुपये, गुंजाळवाडी ते बोरीचा ओढा रस्त्यासाठी 10 लाख रुपये, तळेगाव गावांतर्गत जोडवी वस्ती धनगरवाडा रस्त्यासाठी 15 लाख रुपये ,धांदरफळ बु मधील महाले वस्ती ते नायकवाडी वस्ती करतात 10 लाख रुपये, घुलेवाडीतील मौनगिरी बाबा चौक ते म्हसोबा नगर रस्त्याकरता 25 लाख रुपये व मालपाणी नगर मधील रस्ता करण्यासाठी 10 लाख रुपये, प्रतापपूर मधील विठ्ठल मंदिर ते निघुते वस्तीसाठी 5 लाख रुपये, प्रतापपूर मधील आंधळे वस्ती करता 5 लाख रुपये, आश्वी खुर्द मधील गावांतर्गत रस्त्यांसाठी 5 लाख रुपये, आश्वी खुर्द मधील शिरसागर वस्ती ते स्वामी समर्थ मंदिरा करता 5 लाख रुपये, आश्वी खुर्द मधील मांढरे वस्ती ते कॅनॉल पूल साठी 5 लाख रुपये, आश्वी खुर्द मधील प्रवरा कॅनॉल ते गायकवाड वस्ती 5 लाख रुपये, दाढ खुर्द येथील म्हसोबा मंदिर ते सटवाई मंदिर 5 लाख रुपये, दाढ खुर्द मधील कॅनॉल बोरी ते तळे रस्ता 5 लाख रुपये, सादतपूर मधील शनि टेकडी रस्ता 5 लाख रुपये, पिंपरी लौकी अजमपुर गुहा रस्त्यासाठी 5 लाख रुपये, खळी रोड साठी 5 लाख रुपये, खळी मधील कांगणेवाडी रस्त्या करता 5 लाख रुपये, तसेच घुगे वस्ती करता 5 लाख रुपये, मनोली मधील साबळे वस्ती करता 10 लाख रुपये, कोल्हेवाडी मधील वाकण वस्ती आरगडे वस्ती गाव ओढा रस्ता याकरता प्रत्येकी पाच पाच लाख रुपये, निंबाळे मधील पर्वत वस्ती करता 5 लाख रुपये, कोलेवाडी रस्त्या करता 5 लाख रुपये, जोर्वे मधील सुतार गल्ली साठी 5 लाख रुपये, दिघे वस्ती करता 5 लाख रुपये, काकड वस्ती रस्ता दुरुस्ती करता 5 लाख रुपये, माडी वस्ती करता 5 लाख रुपये, रहिमपूर मधील शिंदे वस्तीसाठी 5 लाख रुपये, गावांतर्गत रस्त्या करता 5 लाख रुपये, कनोली येथील कदम वस्ती करता 5 लाख रुपये, वज्रेश्वरी फाटा रस्त्या करता 5 लाख रुपये, कनकापूर येथील गावांतर्गत आदिवासी रस्त्या करता 5 लाख रुपये, राजापूर येथील शिव रस्ता ते महादेव रस्ता करण्यासाठी 10 लाख, रुपये हंगेवाडी मधील मराठी शाळा ते ओझर रोड पर्यंतच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये, असे एकूण 2 कोटी 73 लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. या निधी अंतर्गत या रस्त्यांची मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या निधीमुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार असल्याने वरील गावांमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व गावांमधील नागरिक, युवक कार्यकर्त्यांनी हा निधी मिळून दिल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS