Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामानवांच्या स्वप्नाची परिपुर्ती करत  व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारावा-प्रा.रामचंद्र भरांडे

नांदेड प्रतिनिधी:- साहित्यसम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त  लोकस्वराज्य आंदोलनआयोजित डॉ. अण्णाभाऊ साठे विचार एल्गार परि

एकल प्लास्टिकचा वापर टाळा… प्रदूषणाला बसेल आळा
कामावरून काढल्याने सात कर्मचाऱ्यांनी केले विष प्राशन
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नगर जिल्ह्यात हितचिंतक अभियानाचा प्रारंभ 

नांदेड प्रतिनिधी:- साहित्यसम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त  लोकस्वराज्य आंदोलनआयोजित डॉ. अण्णाभाऊ साठे विचार एल्गार परिषदमध्ये सुरुवातीला
कार्यक्रमाचे प्रमुख उद्धघाटक अभियंता चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या हस्ते मशाल पेटवून सुरुवात करण्यातआली.
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलन आयोजित डॉ.अण्णाभाऊ साठे विचार एल्गार परिषदेमध्ये अध्यक्षीय मनोगत संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे सर,प्रमुख उद्धघाटक अभियंता चंद्रप्रकाश देगलूरकर,परमेश्वर बंडेवार, रावसाहेबदादा पवार,प्रा.अमरसिंह आईलवार,धोंडोपंत बनसोडे,प्रा.इरवंत सुर्यकर,अर्जुन गायकवाड,संतोष तेलंग,मा. द्रोपदाबाई कांबळे,आदींनी मनोगत व्यक्त केले.डॉ.अण्णाभाऊ साठे विचार एल्गार परिषदेच्या निमित्ताने घेण्यात आलेले ठराव खालील प्रमाणे संमत करण्यात आलेले आहेत.01.शाळा सोडलेला दाखल्या वर जात व धर्म हे आम्ही नाकारतोय असे या एल्गार परिषदेमध्ये ठराव संमत करण्यात आला.02.महामानवांच्या पुतळ्या समोरील व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये असलेल्या देशी/विदेशी दारूची दुकाने व अंड्याचे गाडे असता कामा नये,असे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षका मार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन देऊन हे दारूचे दुकान स्थलांतरित करावेत असा एकमुखी ठराव या परिषद घेण्यात आला.
03.शिक्षणाचे खाजगीकरण बंद झाले पाहिजे असा एकमुखाने ठराव संमत करण्यात आलाआहे.
04.अनुसूचित जाती प्रवर्गाचे अबकड असे स्वतंत्र वर्गीकरण करण्यात यावे असा ठराव संमत करण्यात आला.
05.समतावादी मिशन केंद्र स्थापन करुन आयपीएस,आयएएसअशी उच्च दर्जाचेअधिकारी घडविणारे सरांचाअभिनंदनाचा असा ठराव सर्वानुमते संमत करण्यातआलाआहे.
06.मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या नामक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास मज्जाव करण्यात यावा,असा ठराव संमत करण्यात येतो.
07.मणीपुरमध्ये होत असलेल्या अत्याचाराबाबतीत ही एल्गार परिषद अतिशय संवेदनशीलअसुन आमच्या सहवेदना तेथील आदिवासी बांधवांसोबतआहेत,घडत असलेल्या घटनेबाबत तात्काळ त्यावर कारवाई केली जावी,असा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आलाआहे.
08.आंबेडकरवादी मिशनचे संचालक मा.आयु दीपक कदम सरांनी शैक्षणिक क्रांती करीत असल्या बाबत ही एल्गार परिषद त्यांचे अभिनंदन करते.
या एल्गार परिषदेत सक्रिय सहभागी मा.सेवानिवृत्त कर्मचारी एन.जी.पोतरे,पूज्य भंते भिमानंद,सेवानिवृत्त पोलिसअधिकारी शेषेराव रोडे,मा.नागोराव नामेवार, मा.यादवराव सूर्यवंशी,अंकुशदादा गायकवाड,जिल्हाध्यक्ष युवक आघाडी नांदेड,नागोराव कुडके पत्रकार तथा जिल्हा प्रवक्ते नांदेड,मा.भारत सरोदे,सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक तुकाराम गुंडेकर,मा.एकनाथ रेडे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मा.डी.एन.मोरे खैरकेकर,राजकुमार जांभळीकर,कृष्णा भालेराव, मा.बाळासाहेब टिकेकर डौरकर जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा कोअर कमिटी,मा.माणिक कांबळे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष,लोकस्वराज्य आंदोलन,मा.पोचीराम केदारे तालुकाध्यक्ष मुदखेड,संदीप मेटकर शहर सचिव,लोकस्वराज आंदोलन,मा.कैलास सूर्यवंशी, साईनाथ जळपतराव तालुकाध्यक्ष, नागेंद्र गायकवाड,मारोती दर्शनकर भोकर,तालुकाध्यक्ष युवक आघाडीचे राजु गायकवाड उमरी,आनंद जळपते पत्रकार तथा तालुका उपाध्यक्ष हिमायतनगर, संभाजीराजे वाघमारे,प्रकाश ननुरे,हनुमंत घोरपडे आदी जणांनी ही एल्गार परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले,या परिषदेसाठी तमाम बहुजन बांधव व लोकस्वराज्य आंदोलनाचे लढवय्ये कार्यकर्ते व समाज बांधव यांनी उपस्थित राहुन एल्गार परिषद पुन्हा एकदा यशस्वी केली आहे.या परिषदेला बहुसंख्येने महिला,पुरुष,कर्मचारी,सेवानिवृत्त कर्मचारी,युवक,युवतीची उपस्थित होती.

COMMENTS