Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी

मुंबई प्रतिनिधी - राज्यात गणेशोत्सवाचा सण अगदी आनंदात साजरा केला जात असताना मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणप

येलूरमध्ये तीन सोसायट्यांच्यावर महाडिक गटाचा झेंडा
दिल्लीत 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
जावळीच्या ओझरे शाळेला भारत सरकारचा स्वच्छ विद्यालयाचा दुसरा पुरस्कार जाहीर

मुंबई प्रतिनिधी – राज्यात गणेशोत्सवाचा सण अगदी आनंदात साजरा केला जात असताना मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडपात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये ही हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत. नवसाला पावणारा गणपती म्हणून मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मुंबईत येत असतात. राज्याच्या दर्शनासाठी लाखो लोक रांगा लावतात. यंदाही लालबागच्या राजाला  पाहायला भाविक गर्दी करत आहेत, मात्र दरवर्षी प्रमाणे मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरताना दिसत आहे. सध्या लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडीओत दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केली जात असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान, मंडपात मोठा गोंधळ देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय

COMMENTS