Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रिवेणीश्‍वर देवस्थान येथे मोफत आरोग्य तपासणी

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे पी.व्ही.बेल्हेकर आयुर्वेद मेडिकल कॉलेज यां

पढेगाव व परिसराचे विकास प्रश्‍न सुटले
पाथर्डी नगरपरिषदेवर धडकला हंडा मोर्चा
वरखेड यात्रेनिमित्त तहसील कार्यालयात नियोजन बैठक उत्साहात

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे पी.व्ही.बेल्हेकर आयुर्वेद मेडिकल कॉलेज यांच्या वतीने श्रावण मासाचे औचित्य साधून त्रिवेणीश्‍वर येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले. बेल्हेकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बेल्हेकर व रंजनाताई बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर घेण्यात आले. आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ नारायण भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. निर्मला सचिन सांगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तन्वी निखिल उगले शिक्षक महेश आव्हाड, यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालयातील एकूण पन्नास प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स दहा शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिरामध्ये आलेल्या भाविक व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधांचे मोफत वाटप केले. श्रावणातील दर सोमवारी ही मोफत आरोग्य तपासणी करण्याचा मानस बेल्हेकर कॉलेज च्या टीमने आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला तर त्रिवेणीश्‍वर देवस्थान येथे वर्षभर साजरे होत असलेल्या धार्मिक उत्सवात आयुर्वेद कॉलेजने कायम स्वरूपी ही सेवा देत रहावी त्यांना देवस्थानच्या वतीने सहकार्य केले जाईल असे आवाहन त्रिवेणीश्‍वर देवस्थानच्या वतीने यावेळी करण्यात आले.

COMMENTS