Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांची वीज तोडल्यामुळे महावितरणला ठोकले ठाळे

प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँगे्रसचे आंदोलन

पाथर्डी/प्रतिनिधी ः शासनाने कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका असे एकीकडे सांगितले असले तरी पाथर्डी तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील अनेक गावांचे कने

10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत
अखेर कामगार वसाहतीतील वीजपुरवठा सुरळीत
पत्रकार हत्येशी मंत्री तनपुरेंचा संबंध ; शिवाजीराव कर्डिले यांचा आरोप

पाथर्डी/प्रतिनिधी ः शासनाने कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका असे एकीकडे सांगितले असले तरी पाथर्डी तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील अनेक गावांचे कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी अचानक महाविकास आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी स्थानिक अधिकार्‍याच्या झालेल्या चर्चेमध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित केले.आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी करत जिल्हा ग्रामीणचे अभियंता काकडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत कनेक्शन जोडण्याचे आश्‍वासन घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब धस, माजी नगरसेवक बंडूपाटील बोरुडे, वैभव दहीफळे, चांद मणियार, योगेश रासने, सोमनाथ टेके, दिगंबर गाडे, देवा पवार, आतिश निर्‍हाळी आदीसह विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.टाळे ठोकल्यानंतर काही वेळाने स्थानिक अभियंता अहिरे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे म्हणाले,तालुक्यात सध्या पिके चांगली आली आहेत. सध्या हे शेवटच भरण असून वीज कट केल्यामुळे त्यांना पाणी देता येत.शेतकर्‍यांना खिंडीत पकडू नका.शेतकर्‍यांच्या हतातोंडाशी आलेला घास निघून जाईल.काही भागात प्यायला पाणी नाही त्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत.तसेच सध्या दहावीच्या परीक्षा चालू आहेत.त्याच्या ही अभ्यासाचे वांदे झाले आहेत.त्यामुळे वीज कनेक्शन तोडू नये व तोडलेले कनेक्शन तातडीने जोडून द्यावेत अशी मागणी केली.जिल्हा ग्रामीण चे कार्यकारी अभियंता काकडे यांनी उद्या संध्याकाळ पर्यंत कनेक्शन जोडले जातील असे आदेश दिले जातील असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलन यशस्वी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. वीज वितरण कंपनीची वसुली झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत.वसुलीसाठी आम्ही आमच्या गावागावातील कार्यकर्त्यांना सतर्क करू असेही ढाकणे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS