पुणे ः शाळेत व्यावसायिक भागिदारी देण्याच्या मुद्यावरून एका महिलेची तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी
पुणे ः शाळेत व्यावसायिक भागिदारी देण्याच्या मुद्यावरून एका महिलेची तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी महिला प्राचार्यासाह 3 जणांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात पुर्णिमा मिलिंद कोठारी (वय-63,रा.येरवडा, पुणे) यांनी आरोपी प्राचार्य शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहीत भार्गव (रा.वाघोली, पुणे) यांचे विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
सदरचा प्रकार ऑगस्ट 2019 ते मार्च 2023 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी.पी.गोयंका इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्य शेफाली तिवारी यांनी त्यांची आयुष्मती नावाची ट्रस्ट असल्याचे तक्रारदार कोठारी यांना सांगितले. त्या ट्रस्टची कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कुल चालविण्याबाबतच्या सर्व परवानगी त्यांच्याकडे असल्याचे भासवून आरोपी यांनी तक्रारदार यांना सदर ट्रस्टच्या नावाने कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कुल सुरु करुन भागीदारी देऊ असे सांगितले. त्यानुसार एक ते दोन वर्षासाठी पैशांची गुंतवणूक करण्यास सांगून तक्रारदार यांचेकडून भागीदारीसाठी 1 कोटी 17 लाख 67 हजार रुपये घेण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदार व त्यांचा मुलगा हे दोघे सदर शाळेत 70 टक्के भागीदार असताना, प्राचार्य तिवारी व त्यांच्या साथीदारांनी तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार शाळेत दिला नाही. तसेच शाळेच्या नावाने भागीदार असताना देखील बँक खात्यावर जमा होणारा विद्यार्थ्यांचा निधी व इतर कामांचा निधी स्वत:च्या फायद्याकरिता वापरुन शाळा बंद होण्यास कारणीभूत ठरल्या. त्याचप्रमाणे तक्रारदार हे शाळा बंद होण्यास कारणीभूत असल्याचे विद्यार्थ्यांचे पालकांना सांगून त्यांची नाहक बदनामी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कलम 156 (3) नुसार न्यायालयाचे आदेशाने याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.
COMMENTS