Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहा हजार रुपयांची फसवणूक

नाशिक प्रतिनिधी - पूजेच्या कार्यक्रमासाठी ऑर्डर केलेले आठ किलो श्रीखंड व दहा हजार रुपये घेऊन पसार झालेल्या अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दा

आधी बाहुलीला लावला फास मग 8 वर्षीय चिमुकल्याने स्वतःला घेतला गळफास I LOKNews24
नगरकरांना दिलासा…पाणीपुरवठा वाढणार
नैसर्गिक आपत्ती आणि अनियमित वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट

नाशिक प्रतिनिधी – पूजेच्या कार्यक्रमासाठी ऑर्डर केलेले आठ किलो श्रीखंड व दहा हजार रुपये घेऊन पसार झालेल्या अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भूषण कारभारी सोनवणे (रा. सावतानगर, आगरटाकळी, नाशिक) हे भाभानगर येथे चितळे एक्स्प्रेस येथे काम पाहतात. दि. 4 एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक अज्ञात इसम तेथे आला. त्याने सोनवणे यांच्याकडे पूजेच्या कार्यक्रमासाठी ऑर्डर केलेले आठ किलो श्रीखंड, तसेच दहा हजार सुटे पैसे देण्यास सांगितले आहे, असा बहाणा करून अज्ञात इसमाने श्रीखंड व दहा हजार रुपये घेऊन जात सोनवणे यांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक बिरारी करीत आहेत.

COMMENTS