Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निलंगा तालुका एकसंघ राहण्यासाठी व्यापारी एकवटले

निलंगा प्रतिनिधी - निलंगा तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर त्याचा सर्वांत अधिक फटका येथील व्यापा-यांना बसणार असून तालुका एकसंघ राहावा या मागणीसाठी त

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी
पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांना काठीने चोपले
जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण .

निलंगा प्रतिनिधी – निलंगा तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर त्याचा सर्वांत अधिक फटका येथील व्यापा-यांना बसणार असून तालुका एकसंघ राहावा या मागणीसाठी तालुक्यातील व्यापारी येथील जिजाऊसृष्टी सभागृहात एकत्र येत बैठकीचे आयोजन केले. बैठकीत तालुका एकसंघ राहावा यासाठी माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावेत अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
निलंगा तालुक्यातील 68 गावे हे कासार शिरसी येथे नविन होत असलेल्या अप्पर तहसीलला जोडले जात असल्याने याचा व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक बँकांचे कर्ज काढून व्यापारी व्यापार करीत आहेत. यातच व्यापाराशी जोडलेली 68 गावांची नाळ तोडली तर निलंगा शहरातील व्यापाराला फटका बसणार आहे. बैठकीला शहरातील एकून 40 व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन भाजपाचे अरिंवद पाटील निलंगेकर यांना बैठकीला बोलावून त्यांच्यासमोर व्याप-यांनी व्यथा मांडल्या. माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी तात्काळ लक्ष घालून निलंगा तालुक्यातील 68 गावे कासार शिरसी येथील अप्पर तहसिलला जोडू न देता कायम तालुक्यात ठेवावी, अशी मागणी बैठकीत केली आहे. कासार शिरसीच्या विकासाला आमचा विरोध नाही. त्या भागाचा विकासच करायचा असेल तर कासार शिरसी येथे नगर पंचायत मंजूर करावी तेथे अनेक उद्योग आणावेत. राजकीय व्देषापोटी निलंगा तालुक्याचे तुकडे करणे हे मान्य नाही. निलंगा तालुका एकसंघ राहू द्या असे मत शहरातील शेकडो व्यापा-यांनी व्यक्त केली.
बैठकीस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, मेडिकल संघटनेचे सोमनाथ आग्रे, भांडी दुकान संघटनेचे रत्नदिप बेडगे, मराठा सेवा संघाचे विनोद सोनवणे, वकील संघटनेचे अ‍ॅड.जयंत देशपांडे, अ‍ॅड.प्रसाद जवळगेकर, कृषी फर्टीलायर्झचे मारूती शिंदे, खाजगी वैद्यकीय संघटनेचे डॉ. लालासाहेब देशमुख, संघनक व झेरॉक्स दुकान संघटनेचे जयदेव अनवले, इलिे्ट्ररशन संघटनेचे विष्णू मोहिते, किराणा दुकान संघटना व्यापारी श्रीकांत तोष्णीवाल,फळगाडे व्यापारी मुस्लिम समाज संघटना तर्फे नशीम खतीब, भाजीपाला माळी महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष शरद पेठकर यांच्यासह शहरातील व्यापारी प्रतिनिधी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

COMMENTS