Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचोर्‍यात भरधाव वाहनाने चौघांना उडवले

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात शुक्रवारी भीषण अपघात झाला. भरधाव पिकअपने रस्त्यालगत बसलेल्या चौघांना उडवले. याच दोघांचे पाय निकामी झाले त

एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
नवले पुलावरील अपघातात एकाचा मृत्यू
गुजरात मधील आणंद जिल्ह्यात भीषण अपघात

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात शुक्रवारी भीषण अपघात झाला. भरधाव पिकअपने रस्त्यालगत बसलेल्या चौघांना उडवले. याच दोघांचे पाय निकामी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. चालकाचा भरधाव पिकअप वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाने रस्त्यालगत मंदिरासमोर बसलेल्या चौघांना उडवले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वसंत भाईदास पाटील (वय 42 वर्षे रा. सुरत), विनोद पाटील (वय 50 वर्षे रा. पाचोरा), अमोल वाघ (वय 27 रा. पाचोरा) आणि कुंदन परदेशी (वय 17 वर्षे रा. पुनगाव ता. पाचोरा) अशी जखमींची नावे आहेत.

COMMENTS