Homeताज्या बातम्यादेश

जम्मू काश्मीरमध्ये चार जवान शहीद

राजौरी : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कालाकोट भागात सध्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरु आहे. दोन्ही बाजूंकडून

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नववधूची आत्महत्या
नवी मुंबईतून जप्त केली तब्बल १२५ कोटींचे हेरॉईन (Video)
चाळीसगाव येथील अपघातात तिघांचा मृत्यू ; राज्य गारठलं ; पिकांचं मोठं नुकसान| DAINIK LOKMNTHAN

राजौरी : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कालाकोट भागात सध्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरु आहे. दोन्ही बाजूंकडून सुरु असलेल्या या धुमश्‍चक्रीत 4 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे.
शहीद जवानांचा मृतदेह जंगलातून बाहेर काढण्यात आला आहे. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याला माहिती मिळली होती की, याभागात दोन दहशतवादी लपून बसले आहेत. यानंतर या भागात घेराबंदी करून शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. जम्मू येथील पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राजौरीतील कालाकोट भागातील धरमसाल पोलिस स्टेशनच्या सोल्की गावातील बाजी माल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर घेराव घालण्यात आला. येथे दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील पीर पंजालचे जंगल गेल्या काही वर्षांत अनेक चकमकींनंतर सुरक्षा दलांसाठी आव्हान ठरले आहे. दहशतवादी भौगोलिक स्थिती आणि घनदाट जंगलांचा फायदा घेत भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.

COMMENTS