Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार

लातूर प्रतिनिधी - तुळजाभवानीच्या  दर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लातूर- नांदेड मार्गावर रविवारी पहाटे घडली.कार

फॉर्च्यूनरच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये अपघातात 6 जणांचा मृत्यू
बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी

लातूर प्रतिनिधी – तुळजाभवानीच्या  दर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लातूर- नांदेड मार्गावर रविवारी पहाटे घडली.कार  चालकाचे  कारवरील नियंत्रण सुटून कार उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडकून अपघात झाला.ही धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चौघे मित्र जागीच ठार  झाले. शिवराज लँकाढाई , मोनू कोतवाल, नार्मन कात्रे, व कृष्ण मंडके अशी मयतांची नावे आहेत. कार मध्ये पाच जण तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. कार नर्मन कात्रे चालवत होता. त्याचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार उसाच्या ट्रॅक्टरला जाऊन पाठीमागून धडकली.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे.  पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातात झालेल्या जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे तर चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे

COMMENTS