Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीमा नदी पात्रात बुडून चौघांचा मृत्यू

सोलापूर ः तालुक्यातील सिद्धापूर येथील भीमा नदी पात्रात गेलेल्या नेपाळी कुटुंबातील तीन बालके व दोन महिला पैकी चौघाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झ

वंचितांना सत्तेत आणण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न
राजूर पोलिस स्टेशन वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक
सत्ता नसतानाही माजी आ.प्रदीप नाईक जाणून घेत आहेत जनतेच्या समस्या

सोलापूर ः तालुक्यातील सिद्धापूर येथील भीमा नदी पात्रात गेलेल्या नेपाळी कुटुंबातील तीन बालके व दोन महिला पैकी चौघाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. वाचलेल्या पाचव्या मुलामुळे चौघे पाण्यात बुडण्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाला समजली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सिद्धापूर परिसरामध्ये नेपाळमधील गुरखा कुटुंबीय गस्त घालून उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या सहा ते सात दिवसापुर्वी आले होते. त्यामुळे या परिसरातील ठिकाणाची माहिती नव्हती. आज दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान दोन महिला कपडे धुण्यासाठी त्यांच्यासोबत तीन बालके भीमा नदीपात्रामध्ये गेले त्यामधील एक बालके भीमा नदीपात्रात पोहताना बुडत असल्याने त्याला वाचवण्यासाठी आईने उडी मारली. त्यामधील दुसय्रा बालकाच्या आईने देखील नदीच्या पात्रात उडी मारले परंतु एकमेकांना वाचवण्याच्या नादात चौघेही बुडून मृत्यू झाले. यावेळी वाचलेल्या मुलाने त्याच्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर या परिसरात सिद्धापूर चे नागरिक भीमा नदी पात्रात जमा झाले त्यांनी बुडून दोघांचे मृतदेह नदीपात्रात काढले.

COMMENTS