Homeताज्या बातम्यादेश

चाळीस कामगार अजूनही बोगद्यातच अडकलेले

डेहराडून ः उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा बोगद्यात गेल्या पाच दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांची अजूनही स

सनफार्मा आगीतील दोषींवर गुन्हे दाखल करा- मंत्री कड़ू
कार विहिरीत कोसळून चालकाचा बुडून मृत्यू
बाबा रामदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल

डेहराडून ः उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा बोगद्यात गेल्या पाच दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांची अजूनही सुटका झालेली नाही. कामगारांच्या सुटकेसाठी शर्थीच प्रयत्न करण्यात येत असले तरी, त्यात अनेक अडथळे येतांना दिसून येत आहे. मजुरांच्या सुटकेसाठी दुसरा तात्पुरता बोगदा खोदण्याचे काम सुरू असताना नव्याने भूस्खलन झाल्याने हे खोदकाम थांबवावे लागले.

ढिगारा खोदकाम करण्यासाठी नवे यंत्रे बसवण्यात आली आहे. तर, ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. बोगदा असलेल्या डोंगराची स्थिती नाजूक आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नॉर्वे आणि थायलंडमधील तज्ञांचे मार्गदर्शन उत्तराखंड सरकारकडून घेतले जात आहे. बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह बोगद्याला भेट देणार आहेत. ढिगार्‍याकाळी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी 900 मिमी पाइप टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पाइपमध्ये ‘एक्सेप टनेल’ बसवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाइपमधून बाहेर येताना कामगारांना कुठल्याही प्रकाराचा त्रास होणार नाही. दरम्यान, सिल्क्यरा बोगद्यात खोदकामासाठी बसवलेले यंत्रही नादुरुस्त झाले आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. दिल्लीहून मोठी यंत्रे हवाई दलाच्या मालवाहू विमानाने घटनास्थळी पाठवण्यात आली. या यंत्रणांच्या साहाय्याने कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगवान होईल. बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना ‘पाइप’द्वारे ऑक्सिजन, पाणी, सुकामेवा आणि इतर खाद्यपदार्थ, वीजपुरवठा, औषधे आदींचा पुरवठा सातत्याने केला जात आहे.

कुटुंबियांच्या संतापाचा उद्रेक – सिल्क्यरा बोगद्यात गेल्या पाच दिवसांपासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास होत असलेल्या विलंबामुळे या मजुरांच्या कुटुंबीयांसह नातलगांच्या संतापाचा बुधवारी उद्रेक बघायला मिळाला. ढिगार्‍याच्या आत पाइप बसवून मजुरांच्या सुटकेसाठी ‘एस्केप टनेल’ तयार करण्यासाठी बसवलेली यंत्रे काम करत नसल्याने आणि या उपायांशिवाय इतर पर्यायी योजना नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला.

ऑक्सिजन पुरवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न – उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना अन्न पदार्थापेक्षा ऑक्सिजनची गरज आहे.  अडकलेल्या कामगारांनी ऑक्सिजन पुरवठा विनाअडथळा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. बचावकार्य करणार्‍या चमूचे कर्मचारी कामगारांच्या सातत्याने संपर्कात आहेत. एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी वॉकी टॉकीद्वारे कामगारांशी चर्चा केली. सिल्क्यारा बोगद्यात 40 कामगार अडकले त्याला आता पाच दिवस होत आले आहे. अडकलेल्या कामगारांना चिठ्ठीद्वारे संदेश पाठवण्यात आला. आतमध्ये जेवण पाठवण्यात आले. ते कामगारांपर्यंत पोहोचले. आता त्यांनी प्राणवायूची मागणी केली आहे. मजुरांना निरंतर प्राणवायू पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

COMMENTS