Homeताज्या बातम्यादेश

माजी न्यायमूर्ती टी.बी. राधाकृष्णन यांचे निधन

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांचे सोमवारी केरळच्या कोची येथे निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक खास

आगीच्या वाढत्या दुर्घटना
सकारात्मक विचार व कृतीतच सन्मानाने जगण्याचा मार्ग-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
आमदार थोरात यांचेसह संगमनेरकरांनी लुटला भजे पार्टीचा आनंद

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांचे सोमवारी केरळच्या कोची येथे निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. थोट्टाथिल बी. राधाकृष्णन हे कोलकाता, केरळ, तेलंगणा, हैदराबाद आणि छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. तसेच, ते केरळ लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे कार्यकारी अध्यक्ष सुद्धा होते.थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांनी 1983 मध्ये वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी 14 ऑक्टोबर 2004 रोजी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांना दोनदा केरळ उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याचबरोबर, थोट्टाथिल बी. राधाकृष्णन हे तेलंगणातील विशेष उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. तसेच, त्यांनी छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम केले होते.

COMMENTS