मुंबई : विधान परिषद निवडणूकिसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आ. सदाभाऊ खोत, भाजपचे विक्रम पाटील व मान्यवर. इस्ला
इस्लामपूर / प्रतिनिधी : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 व्या जागेसाठी माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली. 20 जून ला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. आता 6 व्या जागेसाठी आ. सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
आ. सदाभाऊ खोत हे पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक शेतकरी नेते शेतकर्यांचा आवाज म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जाहीर सभेतून टीका करत आहेत. शेतकर्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे नेते म्हणून खोत प्रसिध्द आहेत. भाजपकडून विधान परिषदेसाठी यापूर्वी राम शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, आणि, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पंकजाताईं मुंढे यांना वेगळी जबाबदारी सोपवायची असेल. यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी, असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजपकडे हक्काची 113 मते आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी 27 मतांची आवश्यकता असते. त्यामुळे भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र, पाचव्या आणि सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळू शकते. भाजपकडे आधीच पाचवा उमेदवार निवडून आणताना काही मते कमी पडत आहेत. त्यातच सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
COMMENTS