नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी पार पाडल्यानंतर खातेवाटप देखील जाहीर करण्यात आले आहे. मात्र लोकसभा अध्यक्षपदासाठी नेमकी कुणाची निवड करण
नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी पार पाडल्यानंतर खातेवाटप देखील जाहीर करण्यात आले आहे. मात्र लोकसभा अध्यक्षपदासाठी नेमकी कुणाची निवड करणार, यावर अजूनही शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. मात्र लोकसभा अध्यक्षपदासाठी आंध्रप्रदेशच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षा डी. पुरंदेश्वरी यांचे नाव आघाडीवर आहे.
डी. पुरंदेश्वरी यांच्या नावावर तेलगु देसम पक्ष देखील सहमती दर्शवू शकतो, कारण यामागे राजकारणाव्यतिरिक्त नातेसंबंधाचे पदर देखील दिसून येत आहे. आंध्रप्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष आणि तीन वेळा लोकसभा खासदार डी पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षाचे नाव एनडीए सरकारकडून ठरवण्यात येणार आहे. पुरंदेश्वरी या सध्या आंध्रप्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहे. त्या टीडीपीचे संस्थापक एन.टी.रामाराव यांच्या कन्या आहे. पुरंदेश्वरी यांची बहिण चंद्राबाबू नायडू यांची पत्नी आहे. राजामुंद्री लोकसभा मतदारसंघातून सध्या खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्या दोन वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहे. मात्र 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसकडून 2009 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. 2012 मध्येही त्या वाणिज्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. पुरंदेश्वरी या चंद्राबाबू नायडूंच्या विरोधक म्हणून ओळखल्या जात होत्या, पण आता युती घडवून आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS