Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसाहित्य संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांचे कार्य दीपस्तंभा प्रमाणे : डॉ.अनिल सहस्रबुद्धे

नगर – ज्येष्ठ लोकसाहित्य संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती अभ्यास व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अमुल्य कार्यामुळे अभ्यासकां

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल
जय मल्हार क्रांती संघटनेकडून आमदार पाचपुतेंचा सत्कार
VIRAL BREAKING : इस डॉक्टर ने तो रुला दिया, किसी की तो सुन लो मोदी जी… | पहा Lok News24

नगर – ज्येष्ठ लोकसाहित्य संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती अभ्यास व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अमुल्य कार्यामुळे अभ्यासकांच्या तीन पिढ्या घडवल्या आहेत. त्यांचे या क्षेत्रातील कार्य दीपस्तंभा प्रमाणे आहे. त्यांच्या या कार्याची दखल चतुरंग प्रतिष्ठान ने घेवून त्यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून त्यांचा योग्य सन्मान केला आहे. ही बाब नगरकरांसाठी व संपूर्ण लोकसाहित्य क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. याचा आनंद आनंदोत्सव ट्रस्टला झाला आहे. ट्रस्टचे मार्गदर्शक डॉ. प्रभाकर मांडे यांना प्रतिष्ठत जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करताना मोठा आनंद होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व आनंदोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.

            नगर मध्ये सध्या वास्तव्यास असलेले ज्येष्ठ लोकसाहित्य संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांना डोंबिवली येथील चतुरंग प्रतिष्ठानचा २०२१ वर्षाचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल नगरच्या आनंदोत्सव ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी त्यांचा निवासस्थानी जाऊन सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी मुख्य विश्वस्त सौ. उषा सहस्रबुद्धे, सदस्य प्रा.डॉ. मच्छिंद्र मालुंजकर,  प्रा.डॉ.राजु रिक्कल, वृषाली मांडे आदी उपस्थित होते. डॉ. प्रभाकर मांडे यांनी यावेळी आनंदोत्सव ट्रस्टचे आभार मानले.

डॉ.प्रभाकर मांडे यांच्या कार्याचे कौतुक करताना डॉ.अनिल सहस्रबुद्धे म्हाणाले, डॉ प्रभाकर मांडे यांनी स्वत:चे अभ्यास क्षेत्र म्हणून हे लोकसाहित्य क्षेत्र निवडले. १९७७  मध्ये’ लोकसाहित्य संशोधन मंडळ’  या संस्थेची स्थापना करून त्यांनी ‘लोकसाहित्य परिषद’ आयोजित करण्याची परंपरा सुरू केली. यातून अभ्यासकांच्या तीन पिढ्या घडवल्या आहेत. नवे संशोधक पुढे आले. नवी अभ्यास पुस्तके लिहिली गेली. सर्व विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रम नेमले गेले. मराठी अंतर्गत मानव्यविद्या शाखेत या विषयात पीएचडी पदवी करिता संशोधक पुढे आले. नगर येथे पेमराज सारडा महाविद्यालयात २००७ मध्ये आयोजित केलेली लोकसाहित्य परिषद आजही नगरकरांच्या स्मरणात आहे. आजवर अशा पंचेचाळीस परिषदा महाराष्ट्र व बाहेर झाल्या आहेत. डॉ. मांडे यांची लोकसाहित्याचे स्वतंत्र विद्यापीठ उभे राहावे अशी तळमळ आहे. त्यांची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS