“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…”

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…”

बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

अमरावती प्रतिनिधी - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi rana ) यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किर

उद्धव ठाकरे अहंकारी असुन महानगरपालिकेत त्यांना त्यांची जागा दिसेल
राणा दाम्पत्याविरोधात वॉरंट जारी
खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती प्रतिनिधी – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi rana ) यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख लोकांना किराणा वाटप करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू( Bachu Kadu) यांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे. काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवालही बच्चू कडूंनी विचारला आहे. त्यांनी नाव न घेता राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला आहे.

COMMENTS