Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगेवर नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू

कल्याण प्रतिनिधी -  कल्याण डंपिंग ग्राऊंडला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास  बारावे येथील घनकचरा प्रकल्प केंद्राला

जि.प. : लेट लतीफ कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा
गोदावरी वसाहत भागात साकुरी ग्रामपंचायतीने कचरा टाकू नये
अंतरवाली सराटी लाठीहल्ला प्रकरणात फडणवीस निर्दोष

कल्याण प्रतिनिधी –  कल्याण डंपिंग ग्राऊंडला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास  बारावे येथील घनकचरा प्रकल्प केंद्राला भीषण आग लागली आहे . ही आग इतकी प्रचंड होती की, संपूर्ण डंपिंग ग्राऊंड बेचिराख झाले. आगीच्या ज्वाला आणि धुराच्या लोटांनी कल्याण शहर व्यापले होते. धुरामुळे कल्याणवासीयांचा श्वास कोंडला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून गेल्या पाच तासापासून आज नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून  यात कोणालाही दुखापत झाली नाही.

COMMENTS