अग्नीपथचा अग्नीडोंब…नगरच्या रेल्वेने मागितला पोलिसांना बंदोबस्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अग्नीपथचा अग्नीडोंब…नगरच्या रेल्वेने मागितला पोलिसांना बंदोबस्त

अहमदनगर/प्रतिनिधी : केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ व अग्नीवीर योजनांच्या विरोधात देशातील अनेक राज्यात सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करा
पुण्यात मायलेकराची हत्या; पती फरार असल्यानं गूढ l DAINIK LOKMNTHAN
शिर्डी रामनवमी उत्सवानिमित्त प्रथमच दोन अध्यक्षांची निवड

अहमदनगर/प्रतिनिधी : केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ व अग्नीवीर योजनांच्या विरोधात देशातील अनेक राज्यात सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. मागील चार दिवसांपासून उत्तर भारत व दक्षिण भारतात ही आंदोलने सुरू आहेत. रेल्वे पेटवून देण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर रेल्वे प्रशासनही सर्तक झाले असून, त्यांनी जिल्हा पोलिस दलाकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना अहमदनगर रेल्वेद्वारे पत्र पाठविले आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. तरुणांकडून हिंसक आंदोलने करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांनी विविध ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांना आग लावली आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. अहमदनगर, श्रीरामपूर, नारायणडोह, राहुरी, विळद येथील स्टेशनवर उभ्या असलेल्या गाड्यांना संरक्षण म्हणून पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. आपल्या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रेल्वे स्टेशन्यवर उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांच्या संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात द्यावा, अशी मागणी अहमदनगर रेल्वेद्वारे पोलिस अधीक्षकांना करण्यात आली आहे. या मागण्यांच्या अनुषंगाने आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही पोलिस अधीक्षकांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, उत्तर व दक्षिण भारतात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये रेल्वे गाड्यांना आगी लावण्याच्या घटनांमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. उत्तर व दक्षिण भारतात जाऊ इच्छिणार्‍या नगरच्या रेल्वे प्रवाशांनाही याचा फटका बसला आहे.

COMMENTS