Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील वसतिगृहाला आग

पुणे ः पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील वसतिगृहात वीज मीटरला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान, तसेच महाविद्

कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
बजरंग दलाचा काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा
विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; विकासकामे वेळेत मार्गी लावावी : उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

पुणे ः पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील वसतिगृहात वीज मीटरला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान, तसेच महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे त्वरीत आग आटोक्यात आली. आग लागल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात काही काळ भीती पसरली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नाही.
स.प.महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठयासाठी वापरात असलेला सीटी मीटरने पेट रविवारी सकाळी पेट घेतला. वीज मीटरने पेट घेतल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे घबराट उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच वसतिगृहातील कर्मचार्‍यांनी तातडीने अग्निरोधक उपकरणाचा वापर करून आग आटोक्यात आणली. महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी अग्निशमन दल आणि महावितरणला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. महावितरणच्या पर्वती विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज मीटरची, तसेच विद्युत यंत्रणेची पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जनता वसाहत केंद्रातील जवान सागर देवकुळे, महेंद्र सकपाळ, उमेश शिंदे, सागर पाटील, विजय वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली.

COMMENTS