Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया समोर बेमुदत आंदोलन सुरुच  

विविध सामाजिक राजकिय नेत्यांचा मिळतोय पाठिंबा

बुलढाणा प्रतिनिधि-   बुलढाणा, रायपूर, चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा व त्यांना पाठबळ देणारे पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदे

धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात येणार 10 हजार रेमडीसीविर
गंगा-जमुना तहजीब बरकरार रहे : मूफ्ती अफजल पठाण
ममतांच्या विरोधात उमेदवार दिल्यास भाजपचेच पैसे वाया जातील… तृणमूलचा इशारा

बुलढाणा प्रतिनिधि-   बुलढाणा, रायपूर, चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा व त्यांना पाठबळ देणारे पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी या साठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे व पत्रकार इसरार देशमुख हे दि. २६ जानेवारी पासून जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया समोर बेमुदत आंदोलन करीत आहेत. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, तसेच जिल्ह्याचे नाव जगभर प्रसिद्ध आहे असे असताना बुलढाणा पोलिस प्रशासनाच्या भ्रष्ट वृत्तीमुळे फार कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे. शहरातील चर्च समोर,जयस्तंभ चौक ते गॅरेज लाईन,सुवर्ण गणेश मंदिर समोर टाटा ग्राउंड मध्ये,इकबाल चौक, सुंदरखेड येथील होंडा शो रूम जवळ, बजार गल्लीतील शासकीय गाळ्यात,सार्वजनिक बांधकाम विभाग समोर, रायपूर,सैलानी, देऊलघाट,चिखली पोलिस स्टेशन हद्दीत शहरातील मध्यवस्तीत बाजार मार्केट येथे खुले आम, वरली, मटके, जुगार अड्डे, नगदी तकदिर का बादशहा असे एक नव्हें अनेक अवैध धंदे जोमात सुरू आहेत या मुळे तरुण पिढी बरबाद होत आहे,अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत, अनेक तरुण व्यसनी बनवण्यास सुरुवात झाली आहे, अनेक व्यक्ती गुंड मोकाट फिरत आहेत, दिवसा ढवळ्या लुटमार होत आहे,अनेक महिलांचे दागिने खुलेआम पळविले जात आहेत त्या मुळे पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा वचक राहिलेला नाही,गावगुंड बाजार मार्केट मध्ये मोबाईल फोन चोरत आहे,  लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक आंदोलन केले, निवेदन दिले मात्र येथील भ्रष्ट पोलिस प्रशासन आधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत, उलट तक्रार दाखल करणाऱ्यास धमकी देऊन तक्रार माघे घेण्यास प्रवृत्त केले जाते,त्या मुळे सबंधित पोलिस स्टेशन आधिकरी कर्मचारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी व रायपूर, चिखली, बुलढाणा पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे, जुगार अड्डे, वरली,मटका बंद करावा, अशी मागणी पुरुषोत्तम बोर्डे, इसरार देशमुख यांनी केली आहे तर उपोषण मंडपाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी भेट देऊन पाठिंबा देत आहे या मध्ये राष्ट्रवादी काँगेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष प्रा अनुजा सावळे, नाजिमा शेख, भजप नेते माजी आमदार विजराज शिंदे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे, एमआयएम चे जिल्हाध्यक्ष डॉ मोबीन खान यांच्या सह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पाठिंबा देत आहेत.

COMMENTS