राहुरी ः आर्थिक संस्था चालवत असताना शिस्त गरजेची आहे. ज्या संस्था शिस्तीमध्ये काम करून गरजवंता बरोबरच आपली पत वाढवत असतात अशा संस्था नक्कीच यशस्व
राहुरी ः आर्थिक संस्था चालवत असताना शिस्त गरजेची आहे. ज्या संस्था शिस्तीमध्ये काम करून गरजवंता बरोबरच आपली पत वाढवत असतात अशा संस्था नक्कीच यशस्वी होत असतात. हे साई आदर्श मल्टीस्टेट ने दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, राहुरी येथील मुख्य शाखा असणार्या साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दशकपूर्ती स्मरणिका पुस्तिका प्रकाशन व सभासदांना डिव्हिडंट वाटप तसेच कर्मचार्यांना बोनस वाटप कार्यक्रम महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते तसेच मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुडके आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गिते, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, दि राहुरी अर्बनचे रामभाऊ काळे, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ.संगीता कपाळे,दीपक त्रिभुवन, बाबा महाराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले की, नोटा बंदी, कोरोना संकट काळात या संस्थेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आर्थिक संस्थांमध्ये आपापसात ताळमेळ गरजेचा आहे .गरजूंना वेळेत मदत करणे ठेवीदारांचा विश्वास जिंकणे नितीमत्तेने काम करणे यामुळे पतसंस्थेच्या विश्वस्तांवर विश्वास वाढतो सज्जन लोकांनी सक्रिय व्हावे त्याचबरोबर सक्रीय संगठीत व्हावे त्यामुळे सामान्यांना न्याय मिळतो. कोणतेही काम उभे करणे सोपे आहे मात्र ते चालविणे, टिकविणे कठीण आहे त्यासाठी प्रचंड परिश्रम, जिद्द, चिकाटी हवी. देवाची पूजा एवढीच समाजाचे काम करताना श्रद्धा ठेवली पाहिजे. कपाळे यांच्या हातून आदर्श काम घडत राहो अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सांगितले की, निर्व्यसनी, उत्तम संस्कार असल्याने कपाळे यांनी आपला वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. आर्थिक संस्थांच्या माध्यमातून फसवणूक वाढली आहे त्यामुळे आर्थिक साक्षरता गरजेची आहे. साई आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचारी व संचालकांना प्रशिक्षण दिले जाते ही बाब उल्लेखनीय आहे. त्यामुळेच आर्थिक शिस्त पाळली जाते. प्रास्तविक करताना चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले सभासदांना लाभांश वाटप कर्मचारी यांना एक महिन्याच्या बोनस , कपडे, किराणा वाटप केला जात आहे. सर्व कर्मचारी यांचा 10 लाखांचा विमा संरक्षण संस्थेने दिले आहे. साई आदर्श कर्मचार्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीर उभी राहिली आहे. गेल्या 10 वर्षात 155 कोटी ठेवी हेच संस्थेचे खरे यश आहे. पतसंस्था चळवळ बदनाम होत असताना पारदर्शक काम करुन भक्कम परिस्थिती आम्ही निर्माण केली. संस्थेच्या 18 शाखा त्यातील 9 शाखा स्वमालकीच्या इमारती आहेत ग्रामीण भागात शाखा प्रस्थापित करून सेवा, सुरक्षा, विश्वास व विकास ब्रीद वाक्य. संगणकीकृत आधुनिक सोयी आम्ही देत आहोत. त्यावेळी ह.भ.प. सुडके यांनी भाषणात सांगितले की, साई आदर्श दीन दुबळ्यांची पत वाढविण्याचे काम केले. कर्मचारी यांनी संस्थेला यशाच्या शिखरावर न्यावे. संचालक पारस नहार, बाळासाहेब तांबे, किशोर थोरात, अविनाश साबरे ,चांगदेव पवळे, फैमिदा शेख, बाळासाहेब मुसमाडे तसेच प्रकाश सोनी, हर्षद ताथेड, डॉ. रवींद्र वामन, दत्तात्रय दरंदले, दतात्रय साळुंके, दादा पाटील हारगुडे, डॉ. संदीप मुसमाडे, जयेश मुसमाडे, सुरेश चव्हाण, विलास मुसमाडे, अन्सार शेख,रामेश्वर तोडमल, सभासद, कर्मचारी वृंद आदी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केले तर आभार संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन खडके यांनी मानले.
COMMENTS