Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कदमवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबास शिवसमर्थ संस्थेची आर्थिक मदत

कदमवाडी : येथील जळीतग्रस्त कुटुंबास आर्थिक मदत करताना शिवसमर्थ संस्थेचे कर्मचारी व मान्यवर. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव.) शिराळा / प्रतिनिधी : शि

पाटणच्या कातकरी वस्तीतील नागरिकांचे लसीकरण
सातारा पालिकेचा दणका; बड्या थकबाकीदारांकडून कोट्यवधी वसूल
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24

शिराळा / प्रतिनिधी : शित्तूर-वारूण (ता. शाहुवाडी) पैकी कदमवाडी येथे शिवसमर्थ पतसंस्थेतर्फे जळीतग्रस्त कुटुंबास 35 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
कदमवाडी येथे 30 मार्च रोजी तेरा खणी तिजईच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. यामध्ये सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत पशुधन व सगळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. जनावरांना वाचविताना होरपळलेल्या नामदेव कदम यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कुटुंबाना मदतीचा हात म्हणून शिवसमर्थ मल्टिस्टेट को. ऑफ. क्रेडीट सोसायटीच्या तळमावले व आरळा शाखेतर्फे 35 हजार रुपयांच्या रोख रकमेची मदत करण्यात आली. यावेळी विकास शिरसट, भाऊसो दळवी, विजय पाटील, उत्तम राऊत, तुषार सुतार, अनिल पाटील आदि उपस्थित होते.

COMMENTS