Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर ठाणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला

मुंबई : संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण ओव्हारफ्लो झाले आहे. बदलापूरचे बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या 9 दरवाजांमधून व

समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू
जावलीतील शाळांमधे ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियानास प्रारंभ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
राजपूत समाजापुढील ’भामटा’ शब्द काढणार मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

मुंबई : संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण ओव्हारफ्लो झाले आहे. बदलापूरचे बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या 9 दरवाजांमधून वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आमदार किसन कथोरेंनी या धरणाचे जलपूजन केले आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बदलापूरचे बारवी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार्‍या बारवी धरणाची ड्रोनच्या सहाय्याने विहंगम दृश्य देखील टिपण्यात आलीत. बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने बारवी धरण 1 ऑगस्टरोजीच ओव्हरफ्लो झाले, मागील वर्षी 11 ऑगस्ट रोजी बारवी धरण ओव्हरफ्लो झाले होते. बारवी धरण पूर्ण भरल्यानंतर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे बारवी धरणावर येऊन जलपूजन केले. बारवी धरणाच्या 11 पैकी नऊ दरवाजातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जुलै महिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसाने बदलापूरात पूरसदृश्य परिस्थिती देखील उद्भवली होती. जुलै महिण्यात बरसलेल्या या मुसळधार पावसानेच बदलापूरचे बारवी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

COMMENTS