Homeताज्या बातम्यामनोरंजन

अखेर प्रथमेश परबच्या लग्नाची तारिख ठरली !

मुंबई प्रतिनिधी - गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत लगीनघाई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी हे लग्नाचे फोटो शेअर करत आहेत. तर कोणी लग्न ब

एक हात व पाय नसलेल्या दिव्यांग आश्रुबा भोंडवेंना डॉ.प्रितमताईंनी सामाजिक न्याय द्यावा:- डॉ.गणेश ढवळे
आईस्क्रीममध्ये आढळले माणसाचे बोट
मध्यावधी निवडणुकीसाठी ‘ईडी’ची भीती ; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत लगीनघाई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी हे लग्नाचे फोटो शेअर करत आहेत. तर कोणी लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यातील एक कलाकार म्हणजे ‘टाईमपास’ फेम प्रथमेष परब आहे. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रथमेशनं प्रेमाची कबुली दिली. आता या व्हॅलेंटाईन डे आणि त्या वीकमध्ये त्यांच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम सुरु असणार आहे. त्याविषयी प्रथमेष परबनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लग्नाची तारिखचा सांगितली आहे. प्रथमेशनं आणि क्षितिजानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं त्यांचा साखरपुडा होणार आहे. तर त्याच्या बरोबर 10 दिवसांनी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी त्याचं लग्न आहे. त्यांच्या लग्नाची तारखेचा अखेर प्रथमेश आणि क्षितिजानं त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नाची पत्रिका शेअर करत क्षितिजानं कॅप्शन लग्नाच्या तारखेची बेरीज केली आहे. त्यातून सगळ्याचं उत्तर हे आठ येत असल्याचं पाहायला मिळालं. आठ या आकड्याचा अर्थ इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजेच अर्थात अनंत काळासाठी असा होतो. पुढे क्षितिजा म्हणाली ‘अनंत कायम आहे, आणि तेच माझ्यासाठी तू आहेस, तूच माझा सदैव आहेस.

COMMENTS