Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर आव्हाडांनी केला खेद व्यक्त

मुंबई ः राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी खेद व्यक्त केला आहे. मी श्रीरामांविषयी ओघात बोललो. माझ

तटकरेंसारखा नटसम्राट पाहिला नाही
मुलुंड भांडुप परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनर बाजी
जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई ः राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी खेद व्यक्त केला आहे. मी श्रीरामांविषयी ओघात बोललो. माझे विधान अभ्यासपूर्ण होते. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात, पण आमचा राम आमच्या मनातच आहे, असे ते म्हणालेत.
मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात पण आमचा राम आमच्या हृदयात आहे, असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

COMMENTS