ठाणे /- मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये रोज लाखोंच्या संख्येने लोकं प्रवास करतात. अपवाद वगळता लोकल ट्रेनमधील गर्दी क्वचितच कमी
ठाणे /- मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये रोज लाखोंच्या संख्येने लोकं प्रवास करतात. अपवाद वगळता लोकल ट्रेनमधील गर्दी क्वचितच कमी दिसते. त्यात ठाण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकलच्या गर्दीतून एका १७ वर्षीय मुलीचं फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकाराचा तपास केला असता अपहरण करणारा अन्य कुणी नसून मुलीचा बॉयफ्रेंड असल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबरला ही अल्पवयीन मुलगी बदलापूर ते विक्रोळी असा लोकल प्रवास करत होती. परंतु जेव्हा ती घरी पोहचली नाही तेव्हा कुटुंबाला चिंता लागली. मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होत नव्हता. मुलीचा फोन बंद होता. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत आई वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. मुलगी ट्रेनने एकटी प्रवास करत होती. परंतु ती घरी पोहचली नाही आणि तिच्याशी संपर्क होत नाही असं आई वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्यासोबत १९ वर्षीय मुलावर मुलीला किडनॅप केले असावे असा आरोप केला. पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुलीचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांनी जेव्हा संशयित मुलाचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा त्याचे लोकेशन २५० किमी दूर साताऱ्यात असल्याचे कळाले. पोलिसांचे पथक साताऱ्याला पोहचले. तेव्हा एका घरातून मुलगा बाहेर पडताना त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या घरात पोलिसांनी पाहिले असता तिथे बेपत्ता मुलगी सापडली. पोलिसांनी या मुलाला अटक करून मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले.
COMMENTS