Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा व मुळा धरणातून गावबंधारे भरून द्या

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची मागणी

नेवासा फाटा : भंडारदरा व मुळा धरणामधून सुरु असलेल्या आवर्तनातून नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील केटीवेअर वरील बंधारे गाव तळे भरून देण्याची मागण

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
पालकमंत्री विखे-प्रा. शिंदेंच्या खुर्चीचे रंगले महानाट्य
पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही

नेवासा फाटा : भंडारदरा व मुळा धरणामधून सुरु असलेल्या आवर्तनातून नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील केटीवेअर वरील बंधारे गाव तळे भरून देण्याची मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर जिल्हाधिकार्‍यानी कार्यकारी अभियंता यांना पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी तालुक्यातील बंधारे भरण्याबाबत सकारात्मक चर्चा जिल्हाधिकारी यांच्यासोबत झाल्याचे आमदार मुरकुटे म्हणाले सुरू असलेल्या आवर्तन एक ते दीड महिना उशिरा आल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्‍न बिकट झाला आहे. या आवर्तनातून जो शिल्लक पाणीसाठा राहणार आहे, त्यातून तालुक्यातील सर्व बंधारे गावतळे भरून देण्याची मागणी आमदार मुरकुटे यांनी केली आहे. तालुक्यातील काही गावांना पिण्याचे पाण्याची टँकर सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढे पाऊस वेळेवर न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. त्यामुळे नेवासा तालुक्याक्यारील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी या आवर्तनातून शिल्लक राहिलेल्या पाण्यामधून प्रवरा नदीवरील बंधारे तसेच संपूर्ण तालुक्यातील छोटे बंधारे, गाव तळे भरून देण्याची मागणी नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी निवेदनामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

COMMENTS