गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणास ; शेंडी बायपास येथे शिताफीने अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणास ; शेंडी बायपास येथे शिताफीने अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शरीफ अकबर पठाण ऊर्फ गोट्या (वय 30, र

१२ वी ची परीक्षा पास होण्यासाठी हजारोंनी पैसे देऊनही मदत नाही
हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे निधन
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अहमदनगर/प्रतिनिधी : गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शरीफ अकबर पठाण ऊर्फ गोट्या (वय 30, रा. बस स्टॅन्डच्या पाठीमागे, नेवासा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस कर्मचारी संदीप दरंदले यांनी फिर्याद दिली आहे. शेंडी बायपासजवळ गोट्या गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. कटके यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर सहायक निरीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत गोट्याला अटक केली. गोट्या हा शेंडी बायपासकडून डेअरी चौक एमआयडीसीकडे पायी जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक इंगळे यांच्यासह हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक संदीप दरंदले, संतोष लोंढे, ज्ञानेश्‍वर शिंदे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के व चालक हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैधरीत्या गावठी कट्टे बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे अधिकारी व अंमलदार हे जिल्ह्यातील अवैधरीत्या गावठी गावठी कट्टे बाळगणार्‍यांची माहिती घेत असताना 9 फेब्रुवारी रोजी पोलिस निरीक्षक कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की शेंडी बायपास जाणारा रोडलगत एक मध्यम बांध्याचा मुलगा लाल शर्ट घालून देशी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व काडतुसे जवळ बाळगून आहे. त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार शेंडी बायपास येथे सापळा लावून थांबले असताना मिळालेल्या माहितीतील वर्णनाची व्यक्ती रोडने पायी जात असताना दिसली. त्याला घेराव घालून ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये 30 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व 600 रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा 30 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई एमआयडीसी पोलिस करीत आहे.

COMMENTS