Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कवठेत शॉटसर्किटने आग लागून पन्नास गुंटे ऊस जळुन खाक; अडीच लाखाचे नुकसान

मसूर / वार्ताहर : कवठे येथे इलेक्ट्रिक सप्लाय होत असलेल्या डीपीतून शॉर्टसर्किट होऊन 50 गुंठे आडसाली ऊसाचे पीक जळुन खाक झाला. या घटनेत सुमारे दोन

कृषीकन्या पुंड हिने केले माका येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
थोरात कारखान्याकडून शेतकर्‍यांना 200 रुपये प्रतिटन अनुदान व कामगारांना 20 टक्के बोनस
शंभू सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

मसूर / वार्ताहर : कवठे येथे इलेक्ट्रिक सप्लाय होत असलेल्या डीपीतून शॉर्टसर्किट होऊन 50 गुंठे आडसाली ऊसाचे पीक जळुन खाक झाला. या घटनेत सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी उत्तम विठोबा सूर्यवंशी (रा. नवीन कवठे, ता. कराड) यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
बाधित क्षेत्राचा गावकामगार तलाठी दंडवते यांनी पंचनामा केला आहे. सूर्यवंशी यांचे जुने कवठे हद्दीत गट नंबर 78 मधील 50 गुंठे आडसाली ऊस पीक 30 दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक डीपीतून शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून पूर्ण जळाले आहे. जळीत झालेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई मला मिळावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS