Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेच्या अध्यक्षांना धमकी देणार्‍याला एफआयबीने केले ठार

वॉशिंग्टन/वृत्तसंस्था ः अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या आरोपीला एफबीआयने यमसदनी पाठवले आहे. संबंधित अधिकार्‍यांनी

दशनाम गोसावी समाजाच्या वतीने रायगडावर राज्यभिषक सोहळा संपन्न  
साई समाधीवर सर्वसामान्य साई भक्तांना वस्त्रचढवता येणार- राहुल जाधव
भररस्त्यात टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी

वॉशिंग्टन/वृत्तसंस्था ः अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या आरोपीला एफबीआयने यमसदनी पाठवले आहे. संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की, यूटा येथे राहणार्‍या आरोपीला अध्यक्ष बायडेन हे राज्यात जाण्यापूर्वीच त्याला ठार करण्यात आले. जो बायडन पश्‍चिम अमिरेकेचा दौरा करत आहेत. ते बुधवारी न्यू मॅक्सिको येथे गेले होते, त्यानंतर त्यांचे यूटा येथे येण्याचे नियोजन होते.  फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन संस्थेकडून सांगण्यात आले की, स्पेशल एजेंट वॉरंट घेऊन सॉल्ट लेक सिटीच्या दक्षिणेमध्ये असलेल्या प्रोवोमध्ये क्रेग डिवीयू रॉबर्टसन याच्या घरी पोहोचले होते. यादरम्यान, सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी गोळीबार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार क्रेह डिवीयू रॉबर्टसन याच्याकडे शस्त्रास्त्रे होती. गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

COMMENTS