महिला पोलिसाकडून सासऱ्याला बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यादेश

महिला पोलिसाकडून सासऱ्याला बेदम मारहाण

पोलिसांसमोरच वृद्धाला कानशिलात लगावल्या

नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्ली पोलिसांच्या एका महिला उपनिरीक्षकावर वृद्ध सासऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण लक्ष्मीनगर भागातील आहे. यात मह

पुणतांबा-वाकडी रस्त्यासाठी 9.63 कोटीची मान्यता
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही
इस्त्रोने एकाचवेळी प्रक्षेपित केले 36 उपग्रह

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्ली पोलिसांच्या एका महिला उपनिरीक्षकावर वृद्ध सासऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण लक्ष्मीनगर भागातील आहे. यात महिला उपनिरीक्षकाने स्थानिक पोलिसांसमोर वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केली. स्थानिक पोलीस प्रेक्षक बनून हे सर्व बघत राहिले, पण कोणतीही कारवाई केली नाही. मारहाणीची ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला पोलिसाचं आणि तिच्या वृद्ध सासू सासऱ्यांच्या वादावरील प्रकरण न्यायालयात सुरू आहे. रविवारी अचानक महिला पोलीस तिच्या आईसह सासरच्या घरी पोहोचली. तिथे तिने सासरच्या मंडळींना विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी महिला वृद्धाला कशी चापट मारत आहे. तिने एकापाठोपाठ एक आपल्या सासऱ्याला चापटी लगावल्या.

COMMENTS