मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

15 प्रवासी जखमी, दोन गंभीर

खोपोली प्रतिनिधी - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील प्रवासी मोठ्याप्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आह

यवतमाळ-अमरावती मार्गावरील अपघातात चौघांचा मृत्यू
निंबोडीजवळ गाडीची झाडाला धडक
मुक्ताईनगर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

खोपोली प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील प्रवासी मोठ्याप्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातानंतर तिथले स्थानिक, हायवेवरून जाणारे प्रवासी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 40 किमीच्या अंतरावर हा अपघात झाला आहे.जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे,यामध्ये  15 प्रवाशांना दुखापत झाली आहे. यापैकी 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

COMMENTS