पालघर : आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहून ही कार मुंबईच्या दिशेने येत हो
पालघर : आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहून ही कार मुंबईच्या दिशेने येत होती. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी येथे पोहोचली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर कार आदळली. त्यामुळे भीषण अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. या अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दरवर्षी 1 हजार 960 जणांचा अपघातात मृत्यू – ओव्हर स्पिडिंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा, आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. देशात दरवर्षी साधारण 1.50 लाख वाहनचालक रस्ते अपघातांमुळे मृत्युमुखी पडतात. राज्यातील अपघातांची संख्या कमी होत नाही. 2021 मधील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये 26 हजार 284 पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय संबंधित अपघातांमध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा हकनाक जीव गेला आहे. अपघातात 14 हजार 266 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना त्वरित उपचार न मिळाल्यामुळे अथवा लवकरात लवकर रुग्णालयात दाखल न केल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
COMMENTS