Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा शहरातील नागरी समस्यांविरोधात उपोषण

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा महिलांचा इशारा

नेवासाफाटा ः नेवासा शहरातील नागरी समस्याच्या निषेधार्थ महिला व ग्रामस्थांनी एकत्रित येत श्रीरामपूर रोडवरील श्री खोलीश्‍वर मंदिर चौकामध्ये गुरुवार

शेतकरी हिताच्या योजनांना आडकाठी
आ. निलेश लंकेंची सातासमुद्रापार दखल, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मान l पहा LokNews24
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना आमदार काळेंकडून मदत

नेवासाफाटा ः नेवासा शहरातील नागरी समस्याच्या निषेधार्थ महिला व ग्रामस्थांनी एकत्रित येत श्रीरामपूर रोडवरील श्री खोलीश्‍वर मंदिर चौकामध्ये गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी उपोषण सुरू केले. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.मनिषा वाघ व जनसेवक संतोष पडूंरे यांनी या उपोषणाचे नेतृत्व केले. मागण्याची दखल न घेतल्यास सर्व महिला पुरूष बांधवांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा डॉ.मनिषा वाघ यांनी दिला आहे.
उपोषणस्थळी महिला बचत गटाच्या मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बाळासाहेब मुरकुटे, नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. के.एच. वाखुरे, अ‍ॅड.काका गायके, इंजिनिअर सुनीलराव वाघ, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, कीर्तनकार साधनाताई मुळे, युवा नेते अनिलराव ताके, नगरसेविका डॉ. निर्मला सांगळे, भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा भारती बेद्रे, नामदेव खंडागळे, बाळासाहेब क्षीरसागर, महेश मापारी, भाजपचे शहराध्यक्ष मनोजभाऊ पारखे, व्यापारी राजेंद्र मुथा, प्रतीक शेजुळ, विलास बोरुडे, कृष्णा परदेशी, पोपटराव जीरे, राजेश कडू, सतीश गायके, पंकज जेधे,अँड.दीपक शिंदे, जेष्ठ समाजसेवक रामराव भदगले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. तर स्त्री रोग तज्ञ डॉ.मनिषा वाघ यांच्या महिला मंडळातील सर्व महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाल्या होत्या.
          यावेळी उपोषण कर्त्यांनी म्हटले आहे की, नेवासा नगरपंचायतची मुख्य प्रशासकीय इमारत ही नेवासा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी, सध्या नगरपंचायत ही नेवासा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हलवण्याचे नियोजन सुरू असल्याचे समजते हा निर्णय त्वरित रद्द करावा, पाणीपुरवठा योजनेचे नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने चालू आहे. शहराच्या अनेक प्रभागात पंधरा पंधरा दिवस ते महिना महिना पिण्याचे पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याचे नियमितपणे दिवसाड असे काटेकोर नियोजन शहरातील सर्व भागात करण्यात यावे,पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे वीज बिल हे खूप जास्त येत असल्याने नगरपंचायत फंडाचा बराचसा भाग त्यामध्ये खर्च होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या जुन्या योजनेच्या वीज पुरवठ्यासाठी सोलर सिस्टिम बसवून घेण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा. नेवासा शहराच्या तीनही बाजूला प्रवरा नदीच्या प्रवाहान वेढा आहे. पुराच्या पाण्यापासून शहराचा बचाव होण्यासाठी त्या प्रवाहाच्या बाजूने जुन्या काळापासून भराव टाकलेला आहे. कुठल्याही सबबीवर तो भराव फोडला जाऊ नये. तसेच भरावाचे दुरुस्ती व मजबुतीकरण करून तो पूर्ण क्षमतेने कार्यक्षम करावा, बाजार तळाचा परिसर हा पूर्णतः अतिक्रमण मुक्त करावा. अन्यथा सर्व प्रभागातील नेवासकरांना बरोबर घेऊन नागरी समस्याच्या विरोधात आंदोलन त्रिव करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.

COMMENTS