Homeताज्या बातम्यादेश

शंभू सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

नवी दिल्ली : शेतकर्‍यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम असून, हरिया

सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा
माण तालुक्यातील उसाला तुरे; साखर कारखान्या अभावी उस उत्पादक चिंतेत
एफआरपीची रक्कम मिळणार आता दोन टप्प्यात

नवी दिल्ली : शेतकर्‍यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम असून, हरियाणा पोलिसांनी पुन्हा एकदा शेतकर्‍यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शंभू सीमेवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दिल्लीकडे निघालेल्या 101 शेतकर्‍यांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर केला. यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याशिवाय पोलिसांनी शेतकर्‍यांवर रासायनिक पाण्याचा मारा देखील केला.
शंभू सीमेवरून शेतकर्‍यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा दिल्लीकडे वळवला आहे. यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून शेतकर्‍यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेतकर्‍यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये सुमारे अर्धा तास झटापट झाली. यानंतर पोलिसांनी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. यामध्ये 9 शेतकरी जखमी झाले आहेत. हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवरून 101 शेतकरी दुपारी 12 वाजता दिल्लीला रवाना झाले. घग्गर नदीवर बांधलेल्या पुलावर पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस रॉकेट लाँचरमधून बॉम्ब आणि गोळ्या झाडत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. घग्गर नदीचे दुर्गंधीयुक्त पाणी वापरले जात आहे. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर हरियाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील 12 गावांमधील इंटरनेट बंदी 18 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

COMMENTS