पुसेगाव / वार्ताहर : गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणार्या बैल बाजारावर प्रशास
पुसेगाव / वार्ताहर : गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणार्या बैल बाजारावर प्रशासनाने बंदी घातली होती. यंदाही जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिध्द असलेला बैलबाजार सलग दुसर्या वर्षी प्रशासनाने बंदी आणल्याने व्यापारी आणि शेतकर्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव यात्रेतील बैलबाजार गावाच्या बाहेरील मोकळ्या जागेत भरतो. बैलबाजारात शेतकरी, व्यापारी हजेरी लावतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता कमी असते आणि सुरक्षित सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन आपोआप होते. त्यामुळे या बैलबाजाराच्या माध्यमातून कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे. तरीदेखील प्रशासनाने बैलबाजाराला परवानगी नाकारली आहे.
पुसेगावच्या बैलबाजाराला 70 वर्षांची परंपरा आहे. राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी, व्यापारी खिलार बैल आणि पशुधनाच्या खरेदीसाठी येतात. परिणामी, यात्रा कालावधीत भरणार्या या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बैल बाजार न भरल्याने शेतकर्यांना पशुधनाची खरेदी-विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. कित्येक शेतकर्यांची जातिवंत जनावरे दावणीला बांधून राहिल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. सद्य:स्थितीत बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्याने यंदाच्या बाजारात जनावरांना चांगली किंमत येईल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. मात्र, प्रशासनाने बैल बाजार भरू दिला जात नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
COMMENTS