Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विम्यामुळे मिळतेय शेतकर्‍यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत

कडा प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातील 100 मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. शेती व्

मतदान आणि आयोग !
महापारेषणकडून आशादीप विशेष मुलांच्या शाळेस मदत
अखेर बेशरम आंदोलनला यश; रंग-रंगोटी करत दुभाजक दुरुस्तीला सुरुवात-मिलिंद सरपते

कडा प्रतिनिधी – आष्टी तालुक्यातील 100 मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. शेती व्यवसाय करताना होणार्‍या दुर्दैवी अपघातामुळे शेतकर्‍याचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते.अशा कालावधीत शेतकर्‍याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अंमलात आणली गेली. वीज पडून मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, शॉक लागून मृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास त्या शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 2005-06 साली ’शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरू केली. त्यानंतर योजनेचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना’ असे नामकरण केले. 2009-10 मध्ये या योजनेसाठी 1 लाख एवढा विमा होता परंतु या योजनेचे हित लक्षात घेऊन पुढे सन 2016 मध्ये 2 लाख रुपये एवढी वाढ करण्यात आली व त्याचा शेतकर्‍याच्या वारसांना लाभ मिळाला आहे ह्यात  रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू,  उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व रानटी  जनावरांच्या हल्ल्यामुळे मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल हे अपघात  लाभासाठी पात्र ठरतात. आष्टी तालुक्यातील वेगवेगळ्या अपघातामुळे मयत झालेल्या शंभर शेतकर्‍यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचा 2 कोटींची मदत देण्यात आल्याची माहिती मिळाली. व 33प्रस्ताव मंजुरी साठी दाखल करण्यात आली आहेत शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्यास कृषी कार्यालया कडे प्रस्ताव दाखल करावेत असे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी आवाहन केले आहे.

COMMENTS